आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री कंगना रनोटच्या आगामी थलायवी या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरमधील कंगनाच्या अभिनयाचे चाहत्यांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले होते. आता कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अक्षय कुमार सारख्या बड्या स्टार्सनी सिक्रेट कॉल आणि मेसेज करुन 'थलायवी'च्या ट्रेलरचे कौतुक केल्याचे उघड केले आहे. इतकेच नाही तर बॉलिवूडमध्ये मूव्ही माफियांची दहशत असल्याने अनेक बडे कलाकार माझे जाहीरपणे कौतुक करायला घाबरतात, असेही कंगना म्हणाली आहे.
अक्षय कुमारसारखे बडे स्टार्स सिक्रेट कॉल करुन करतात कौतुक
कंगना रनोटने पटकथा लेखक अनिरुद्ध गुहा यांच्या एका पोस्टला उत्तर देताना ही पोस्ट टाकली आहे. अनिरुद्ध गुहा यांनी एका पोस्ट शेअर करत कंगनाचे कौतुक केले आहे. बॉलिवूडच्या विरोधात जाणे तुम्हाला धोक्याचे ठरू शकते अशी एक पोस्ट अनिरुद्ध यांना दिसली. या पोस्टला रिट्विट करत ते म्हणाले, ” कंगना रनोट याला अपवाद आहे, पिढीमध्ये एकदाच होणारी अभिनेत्री.” असे ते म्हणाले आहेत. कंगनाने अनिरुद्ध यांच्या पोस्टला उत्तर देत बॉलिवू़डवर निशाणा साधला. 'बॉलिवूडमध्ये इतके शत्रूत्व आहे की माझी स्तुती करणोही एखाद्याला महागात पडू शकतो. मला सिक्रेट कॉल आणि मेसेज येतात. अक्षय कुमारसारख्या बड्या स्टार्सचेही. त्यांनी थलायवीचो खूप कौतुक केलो पण ते आलिया आणि दीपिकाच्या चित्रपटांप्रमाणे माझे जाहीरपणे कौतुक करू शकत नाहीत. मूव्ही माफियांची दहशत,' असे म्हणत कंगनाने बॉलिवूडमधील गटबाजीवर वक्तव्य केले आहे.
कलेशी संबंधित क्षेत्राचे उद्दिष्ट कलाच असायला हवे होते
यानंतर कंगना आणखी एक पोस्ट शेअर करत म्हटले, 'कलेशी संबधित या क्षेत्राचे उदिष्ट कलाच असायला हवे होते. पावरच्या या खेळात आणि राजकारणात सामील न होता, खास करून जेव्हा चित्रपटाची वेळ येते. माझ्या राजकीय आणि आध्यात्मिक विचारांवरून मला लक्ष करून माझा छळ करू नये आणि त्यांनी जर असे केले तर अर्थातच विजय माझाच होईल,” अशा आशयाची पोस्ट कंगनाने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.