आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅपअप:कंगना रनोट पूर्ण केले 'धाकड'चे चित्रीकरण, रॅपअप पार्टीत दिसला ग्लॅमरस अंदाज; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'धाकड' 1 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे

अभिनेत्री कंगना रनोट हिने गुरुवारी बुडापेस्ट येथे तिच्या आगामी 'धाकड' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. स्वतः कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. कंगनाने चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीतील एक फोटो शेअर केला आणि लिहिले, "माझ्या चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. आतापासून 'धाकड'ची आठवण येतेय." या पोस्ट व्यतिरिक्त, तिने चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीतील कंगना रनोटची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये कंगना व्हाइट ब्रालेट आणि पँटमध्ये अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. तिने स्वतःचे दोन ग्लॅमरस फोटो शेअर करत गालिब यांचा एक शेर लिहिला आहे. ती म्हणते, "मोहब्बत मैं नहीं है फर्क जीने और मरने का, उसी को देख कर जीते हैं जिस काफिर पे दम निकले -गालिब।" याशिवाय कंगनाने सोशल मीडिया स्टोरीवर चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती टीम मेंबर्ससोबत एन्जॉय करताना दिसत आहे.

'धाकड' 1 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे
‘धाकड’ हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट असून यात कंगना अर्जुन रामपालसोबत झळकणार आहे. या चित्रपटात कंगना गुप्तहेराची भूमिका साकारणार असून ‘एजंट अग्नी’ असे तिचे नाव असणार आहे. तर अर्जुन रुद्रवीर या खलनायकाच्या भूमिकेत असेल. या चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळाणार असून हॉलिवूडमधील नावाजलेल्या अ‍ॅक्शन दिग्दर्शकाने हे सीन दिग्दर्शित केले आहेत. रजनिश घई या चित्रपटाचे दिग्दर्शक असून सोहेल मकलाई याची निर्मिती करणार आहेत. चित्रपट यावर्षी 1 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल.

'धाकड'नंतर आता 'तेजस'चे शूटिंग सुरू करणार कंगना
'धाकड'नंतर कंगना रनोट लवकरच 'तेजस'चे शूटिंग सुरू करणार आहे. याशिवाय तिने 'अपराजित अयोध्या', 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा' आणि काश्मिरी पंडितांवरील अत्याचारावर आधारित अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. तिच्या निर्मितीच्या आणखी एका चित्रपटात ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...