आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Actress Kangana Ranaut Turns Producer With 'Tiku Weds Sheru', Set For Her Digital Debut By Her Production House Manikarnika Films And Launches Its Logo

कंगनाची नवी सुरुवात:'टीकू वेड्स शेरू' या चित्रपटाद्वारे निर्माती म्हणून डिजिटल विश्वात करतेय पदार्पण, प्रॉडक्शन हाऊस 'मणिकर्णिका फिल्म्स'चा लोगोदेखील केला लाँच

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

अभिनेत्री कंगना रनोट आता निर्माता बनली आहे. चित्रपटांसोबतच आता कंगनाने डिजिटल विश्वातही पदार्पण केले आहे. शनिवारी कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिचे प्रॉडक्शन हाऊस 'मणिकर्णिका फिल्म्स'चा लोगो लाँच केला. सोबतच ‘टीकू वेड्स शेरू’ या चित्रपटाद्वारे निर्माती म्हणून डिजिटल विश्वात पदार्पण करणार असल्याचेही तिने जाहीर केले आहे.

कंगना रनोटने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'मणिकर्णिका फिल्म्सचा लोगो लाँच केला आहे. तसेच “टिकू वेड्स शेरू” या प्रेमकथेद्वारे आम्ही डिजिटल विश्वास पदार्पण करत आहोत. आपणा सर्वांचा आशीर्वाद हवा आहे," अशी पोस्ट कंगनाने शेअर केली आहे.

आम्ही नवीन टॅलेंट लाँच करू
कंगना रनोट म्हणाली, "डिजिटल विश्वात आम्ही हुशार, न्यू एज कंटेंट आणू. नवीन चेह-यांना संधी देऊ आणि नवीन संकल्पना घेऊन जोखीम उचलू," असेही कंगना म्हणाली आहे.

बातम्या आणखी आहेत...