आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कंगनाची मागणी:अभिनेत्री कंगना रनोटकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटची मागणी, ठाकरे सरकारचा फॅसिस्ट सरकार म्हणून उल्लेख

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने एक ट्विट केले असून त्यात तिने राज्य सरकारचा उल्लेख फॅसिस्ट सरकार असा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटने पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर असताना राज्य सरकार मात्र त्यांच्याविरूद्ध बोलणार्‍या लोकांना त्रास देण्यात व्यस्त असल्याचा आरोप कंगनाने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार विरुद्ध कंगना असा वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. आता कंगनाने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. कंगनाने यासंदर्भात एक ट्विट केले असून त्यात तिने राज्य सरकारचा उल्लेख फॅसिस्ट सरकार असा केला आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना विशेषाधिकार उल्लंघनाबद्दल महाराष्ट्र विधानसभेने 60 पानी पत्र पाठवले आहे. या संदर्भात कंगनाने गोस्वामी यांचे समर्थन करत हे ट्विट केले आहे.

"कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर होत चालली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. असे असताना फॅसिस्ट राज्य सरकार मात्र त्यांच्याविरूद्ध बोलणार्‍या लोकांना त्रास देण्यात व्यस्त आहे, आम्हाला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट पाहिजे आहे, #फासिझम थांबवा", असे ट्विट कंगनाने केले आहे.

  • अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर केली होती जहरी टीका

आधी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत, मग बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन आणि आता खासदार जया बच्चन यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरुन अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने कंगनावर निशाणा साधला होता. त्यानंतर संतापलेल्या कंगनाने उर्मिला मातोंडकरचा उल्लेख 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हणून केला होता.

कंगना एका मुलाखतीत म्हणाली की, "उर्मिला मातोंडकरचा एक इंटरव्‍ह्यू पाहिला. ज्याप्रकारे ती माझ्याबद्दल बोलत आहेत, ते पूर्णत: डिवचण्यासारखे आहे. तिने माझ्या संघर्षाची खिल्ली उडवली. मला भाजपकडून तिकीट हवंय, असे वाटत असल्याने ती माझ्यावर हल्ला करत आहे. उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. ती नक्कीच तिच्या अभिनयासाठी ओळखली जात नव्हती. ती कशासाठी ओळखली जायची, सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? जर तिला तिकीट मिळू शकते तर मला का नाही मिळणार?", असे कंगना म्हणाली.

यावर उर्मिलाने ट्विट करत अतिशय संयमी प्रतिक्रिया दिली. "प्रतिशोध मनुष्य को जलाती रहती है, संयमही प्रतिशोध को काबू करने का उपाय होता है. शिवाजी महाराज अमर रहें." असे ट्विट उर्मिलाने केले आहे.