आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'थलायवी' अपडेट:कंगना रनोटच्या 'थलायवी'च्या तामिळ व्हर्जनला मिळाले 'U' सर्टिफिकेट, निर्माते लवकरच हिंदी आणि तेलुगु व्हर्जनसाठी करतील अर्ज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑगस्टमध्ये रिलीज होऊ शकतो 'थलायवी'

अभिनेत्री कंगना रनोटच्या आगामी 'थलायवी' चित्रपटाच्या तामिळ व्हर्जनला कोणत्याही कटशिवाय 'U' सर्टिफिकेट देण्यात आले आहे. निर्माते आता लवकरच चित्रपटाच्या हिंदी आणि तेलुगु व्हर्जनच्या सर्टिफिकेटसाठी अर्ज करतील. या चित्रपटात कंगना अभिनेत्री आणि तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. जयललिता यांचा चित्रपट ते राजकारणापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. जयललितांच्या भूमिकेत एकरुप होण्यासाठी कंगनाने आपले बरेच वजन वाढवले ​​होते. चित्रपटाचे दिग्दर्शन ए.एल. विजय यांनी केले असून यापूर्वी त्यांनी अनेक तामिळ आणि तेलुगु चित्रपटासांठी दिग्दर्शक म्हणून भूमिका बजावली आहे.

ऑगस्टमध्ये रिलीज होऊ शकतो 'थलायवी'
'थलायवी' हा चित्रपट 23 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार होता, पण देशातील आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकत असल्याची घोषणा करताना ‘थलायवी’चे निर्माते म्हणाले होते की, “हा चित्रपट एकापेक्षा जास्त भाषांमध्ये तयार झाला असल्याने, तो एकाच दिवशी सर्व भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची आमची इच्छा आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे सावधगिरी व लॉकडाउन बघता जरी आमचा चित्रपट रिलीजसाठी सज्ज असला तरी आम्हाला सरकारच्या अटी व शर्तींना पाठिंबा दर्शवायचा आहे. म्हणूनच आम्ही 'थलायवी'चे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे." या चित्रपटाच्या जवळच्या सुत्राने सांगितल्यानुसार, “निर्मात्यांनी आता हा चित्रपट यावर्षी ऑगस्टमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची योजना आखली आहे.”

'धाकड' आणि 'तेजस'मध्ये दिसणार आहे कंगना
'थलायवी'शिवाय कंगना 'धाकड' चित्रपटातही दिसणार आहे. रजनीश घई दिग्दर्शित या अ‍ॅक्शन एंटरटेनर चित्रपटात कंगनासह अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. निर्माते हा चित्रपट 1 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित करण्याचा विचार करीत आहेत. याशिवाय कंगनाचा 'तेजस' हा आणखी एक आगामी चित्रपट आहे. यात ती हवाई दलाच्या अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...