आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Kangana Ranaut: Latest Breaking News On Kangana Uddhav Thackeray Government | Queen Actor Called Mumbai As Pakistan Occupied Kashmir (PoK)

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना VS महाराष्ट्र सरकार:'मुव्ही माफिया, सुशांतसिंह राजपूतचे मारेकरी आणि ड्रग्स तस्करांसोबत उद्धव ठाकरेंचे लाडके चिरंजीव आदित्य असतात- कंगना रनोट

मुंबई4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कंगनाच्या मुंबईतील खारस्थित घरी अवैध बांधकाम केल्याप्रकरणी बीएमसीने कंगनाला आणखी एक नोटीस बजावली आहे

मुंबईत पाच दिवस राहिल्यानंतर अभिनेत्री कंगना रनोट सोमवारी सकाळी बहीण रंगोलीसह मनालीला रवाना झाली. मनालीला रवाना होण्यापूर्वी कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देणारे ट्वीट केले आहे. विशेष म्हणजे, यात कंगनाने उद्धव यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांचे नाव घेतले आहे.

कंगना म्हणाली- बघुयात कोण कुणाला फिक्स करतं ते...

कंगना सोमवारी मनालीस्थित तिच्या घरी पोहोचली. त्यानंतर तिने एक ट्विट केले. तिने लिहिले, 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची हीच मूळ समस्या आहे की, मी मुव्ही माफिया, सुशांत सिंहचे हत्यारे आणि त्यांचं ड्रग्ज रॅकेट यांचा पर्दाफाश केला. ज्यांच्यासोबत त्यांचा प्रिय मुलगा आदित्य ठाकरे फिरत असतो. हाच माझा मोठा गुन्हा आहे, त्यामुळे ते मला मॅनेज करू पाहत आहेत. पण, बघू कोण कुणाला फिक्स करतं ते.'

सोनिया सेनेने मुंबईत स्वतंत्र काश्मीरचे नारे लावले - कंगना

यापूर्वी कंगनाने एकामागून एक पाच ट्विट केले होते. तिने सोनिया सेनेने मुंबईत स्वतंत्र काश्मीरचे नारे लावले, असे म्हटले.

पहिले ट्विट

दुसरे ट्विट

तिसरे ट्विट

चौथे ट्विट

कंगना म्हणाली - मी जड अंतःकरणाने मुंबई सोडत आहे

मुंबई सोडण्यापूर्वी कंगनाने ट्विटमध्ये म्हटले की, “मी जड अंतःकरणाने मुंबई सोडत आहे, या दिवसात मला सतत एक प्रकराची दहशत वाटली. माझ्या कामाचे ठिकाण उद्धवस्त केल्यानंतर आता माझे राहते घर तोडण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे, सततचे हल्ले आणि शिवीगाळ केली गेली. माझ्याभोवती सावध सुरक्षा होती. पीओकेबद्दलचा माझा मुद्दा बरोबर होता, असे म्हणायला हरकत नाही.'

याशिवाय कंगनाने आणखी एक ट्विट केले ...

यापूर्वी रविवारी मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) कंगनाला तिच्या राहत्या घरासंदर्भात नवीन नोटीस पाठवली आहे. ही नोटीस कंगनातील खार येथील घरी करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांसंदर्भातील आहे.

बीएमसीच्या म्हणण्यानुसार, कंगना रनोटच्या घरात बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे कंगनाच्या कार्यालयापेक्षाही घरात अधिक बीएमसीच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे कंगनाच्या कार्यालयानंतर आता घरावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

कंगना मुंबईतील खार (पश्चिम) राहते. ऑरकिड ब्रिजच्या 16 क्रमांच्या एका इमारतीच्या 5 व्या मजल्यावर तिचे 3 फ्लॅट आहेत. एक फ्लॅट 797 चौरस मीटर, दुसरा फ्लॅट 711 चौरस मीटर आणि तिसरा फ्लॅट 459 चौरस मीटरचा आहे. 8 मार्च 2013 रोजी या तिन्ही फ्लॅटची कंगनाच्या नावावर नोंद झाली आहे. कंगनाने हे फ्लॅट घेतल्यानंतर 5 वर्षांनी 13 मार्च 2018 रोजी बीएमसीला या फ्लॅट्समध्ये बेकायदेशीर बांधकाम केलेले आढळले. याबाबतच्या तक्रारीनंतर 26 मार्च 2018 मध्ये बीएमसीकडून कंगनाच्या फ्लॅट्सची पाहणी करण्यात आली. त्याच दिवशी कंगनाला बीएमसीने बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी नोटीस दिली.

बीएमसीने या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कंगनाला उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली. तसेच समाधानकारक उत्तर न मिळाल्यास ते बांधकाम हटवण्याचा इशारा देण्यात आला. 22 मे 2018 रोजी या प्रकरणी सिव्हिल कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. आता बीएमसीने न्यायालयाकडे तात्काळ कारवाई करण्याची परवानगी मागितली आहे. याची सुनावणी 25 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे.

 • आज उच्च न्यायालयात उत्तर दाखल केले जाईल

कंगनाचे वकील ऑफिसमधील बेकायदा बांधकामांबाबत उच्च न्यायालयात आपले उत्तर सादर करतील. आजच त्यांना कार्यालयाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे सोपवावी लागतील. त्याचबरोबर कोर्टाने बीएमसीला 18 सप्टेंबरपर्यंत लेखी उत्तर देण्यास सांगितले आहे. बीएमसीने ही कारवाई बेकायदेशीर मार्गाने केल्याचा आरोप कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला. यासाठी ते बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात गेले होते आणि तेथे तातडीने सुनावणी झाली होती, त्यानंतर तोडफोडीवर बंदी घालण्यात आली.

बीएमसीने कंगना रनोटला पाठवलेल्या नोटीसमध्ये फ्लॅटमध्ये 8 प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम केल्याचे म्हटले आहे.

 • इलेक्ट्रिक फिटिंगची जागा सिमेंटने भरण्यात आली आणि त्याचा उपयोग कार्पेट एरिया म्हणून करण्यात आला.
 • झाडं लावण्यासाठी असलेल्या जागेवर पायऱ्या करण्यात आल्या.
 • खिडकीवर लावण्यात आलेल्या सज्जाच्या भिंती काढून त्याचा उपयोग बाल्कनी म्हणून करण्यात येत आहे.
 • सर्विस स्लॅब सिमेंटने भरला आहे आणि त्याच्या शेजारची भिंत तोडून त्याचे रुपांतर बाल्कनी आणि रुममध्ये करण्यात आले.
 • उत्तर-पश्चिम दिशेने पायऱ्या आणि स्वयंपाकघर यामध्ये कॉमन रस्ता आणि स्वयंपाक घराजवळ दरवाजा बनवण्यात आला.
 • 3 फ्लॅट्समध्ये असलेल्या कॉमन जागेवर लिफ्टच्या समोरच बेकायदेशीर दरवाजे तयार करण्यात आले आहेत.
 • तिन्ही फ्लॅट्सला जोडण्यासाठी विना परवानगी कॉमन भिंत तोडण्यात आली.
 • शौचालय आणि बाथरुमजवळील पाईपचा आकार बदलण्यात आला आहे.
Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser