आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कनिकाला कोरोना:अभिनेत्री कनिका कपूर चौथ्या तपासणीतही आढळली कोरोना पॉझिटिव्ह, मात्र वडिलांनी केले बातमीचे खंडन

Mumbai8 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • आयसोलेशनमध्ये असलेल्या कनिकाला सतावते आहे मुलांची आठवण, लिहिली इमोशनल पोस्ट

बॉलिवूड डेस्क : बॉलिवूड गायिका कनिका कपूरचा चौथा वैद्यकीय अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. लखनऊमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल असलेल्या कनिकाचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याने तिच्या नातेवाइकांची चिंता वाढली आहे. २० मार्चला कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कनिका ९ मार्चला लंडनहून परतली आहे. विदेशातून आल्यानंतर ती कानपूर आणि लखनऊनध्ये गेली होती. तिथे तिला सर्दी आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला.

मात्र कनिकाचे वडिल राजीव यांनी या बातमीचे खंडन केले आहे. दैनिक भास्करसोबत बातचीत करताना ते म्हणाले, "माझी मुलगी अगदी व्यवस्थित आहे. मागील काही दिवसांपासून तिच्या तब्येतीबद्दल येत असलेल्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. सध्या तिला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. मी तिच्यासोबत सतत फोन आणि व्हिडिओ द्वारे संपर्कात आहे. तिची तब्येत सुधारत आहे."

ते पुढे म्हणाले, "ज्या दिवसापासून कनिका कोरोना पॉजिटिव्ह असल्याची बातमी बाहेर आली आहे, तेव्हापासून तिच्याविषयी अनेक अफवा पसरत आहेत. जर आम्ही टेस्ट करूनच घेतली नाही तर हा चौथा रिपोर्ट कुठून आला ? कनिकाचे सुरुवातीचे पॉझिटिव्ह होते, त्यावरूनच तिच्यावर उपचार होत आहेत. तिचे उपचार खूप योग्य पद्धतीने होत आहे आणि खरे सांगायचे तर ती पहिल्या दिवसापासूनच स्वस्थ जप्ती. फक्त काही लक्षणे होती, ज्यामुळे तिला रुग्णालयात भरती केले गेले होते."

कनिकाच्या होत असलेल्या निंदेबद्दल वडिल राजीव म्हणाले, "अनेक लोक कनिकाबद्दल चुकीचे बोलत आहेत. आम्हाला अनेकांची निंदाही झेलावी लागते आहे. पण या सिचुएशनमध्ये आम्ही दुसरे काय करू शकतो ?''

दुसरीकडे कनिकाला तिच्या मुलांची आणि कुटुंबीयांची खूप आठवण येत आहे. याबद्दल तिने सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट लिहिली आहे. कनिकाने आपल्या पोस्टमध्ये फॅन्ससाठी प्रेम व्यक्त केले आणि त्यांना सुरक्षित राहण्याची अपील केली आहे. तिने लिहिले, "माझी काळजी करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. पण मी आयसीयूमध्ये नाहीये. आशा आहे की, माझी पुढची टेस्ट निगेटिव्ह येईल. घरी जाण्याची आणि मुले, कुटुंबियांना भेटण्याची उत्सुकतेने वाट पाहात आहे. त्यांची खूप आठवण येत आहे."