आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पतौडी घराण्यात पुन्हा एकदा पाळणा हलला:दुसऱ्यांदा आई-बाबा झाले सैफ आणि करीना, मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयात दिला मुलाला जन्म

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2016 ला त्यांनी पहिला मुलगा तैमुर अली खानला जन्म दिला होता.

करीना कपूर आणि सैफ अली खान पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत. करीनाने रविवारी मुलाला जन्म दिला. तिला काल शनिवारी रात्री मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. करीना आणि सैफने ऑगस्ट 2020 मध्ये दुसऱ्यांदा पालक होणार असल्याची घोषणा केली होती. 2016 ला त्यांनी पहिला मुलगा तैमुर अली खानला जन्म दिला होता.

करीनाने डिलिव्हरीपूर्वीही काम करणे बंद केले नव्हते. शनिवारी ती आपल्या टीम आणि मेकअप आर्टिस्ट मिक्की कॉन्ट्रॅक्टरसह शूटसाठी रवाना होत असताना दिसली होती. दरम्यान ती कोणत्या प्रोजेक्टची शूटिंग करण्यासाठी गेली होती, याविषयी स्पष्ट झालेले नाही.

साराच्या वाढदिवशी केली होती प्रेग्नेंसीची घोषणा
सैफ आणि करीनाने 16 अक्टोबर 2012 ला मुंबईमध्ये लग्न केले होते. 20 डिसेंबर 2016 ला मुलगा तैमुर अली खानचा जन्म झाला. 12 ऑगस्ट 2020 ला सारा अली खान (सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंहची मुलगी) च्या 25 व्या वाढदिवशी सैफ-करीनाने घोषणा केली होती की, ते दुसऱ्यांदा पालक बनत आहेत.

करीनाचे अपकमिंग प्रोजेक्ट्स
करीनाना अपकमिंग चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'मध्ये दिसणार आहे. याची शूटिंगही तिने पूर्ण केली आहे. प्रेग्नेंसीदरम्यानही ती या चित्रपटाची शूटिंग करत होती. चित्रपटात तिच्यासोबत आमिर खान, मोना सिंहही आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वेत चंदन हे करत आहेत. 'लाल सिंह चड्ढा' हॉलिवूड चित्रपट 'द फॉरेस्ट गंप' चा हिंदी रिमेक आहे. करीना या चित्रपटासोबतच करण जोहरचा आगामी चित्रपट 'तख्त'मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, आलिया भट, विक्की कौशल, जान्हवी कपूर, अनिल कपूर आणि भूमी पेडणेकर महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. तर सैफ अली खान, 'आदिपुरुष', 'भूत पुलिस' आणि 'बंटी बबली 2' चित्रपटात दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...