आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्रिया:करीना कपूर खानने सीतेच्या भूमिकेसाठी मागितले होते 12 कोटी रुपये?  करीनाने पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करीनाने दिले हे उत्तर

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अलौकिक देसाई यांच्या आगामी सीता या चित्रपटातील भूमिकेसाठी चर्चेत होती. करीनाने सीतेच्या भूमिकेसाठी 12 कोटी रुपये मानधन मागितल्याचे म्हटले गेले होते. त्यावेळी तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. याविषय करीनाने स्पष्टीकरण किंवा चर्चा केली नव्हती. मात्र अलीकडेच एका मुलाखतीत करीनाने यावर वक्तव्य केले आहे.

करीनाने दिले हे उत्तर
करीनाने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत करीनाने सीतेच्या भूमिकेसाठी मागितलेल्या मानधनाविषयी चर्चा केली आहे. “करीनाचे पुढचे प्रोजेक्ट्स कोणते आहेत? यावर्षाच्या अखेरीस ‘लाल सिंग’ चड्ढा प्रदर्शित होणार. त्यानंतर 12 कोटी रुपये मानधनाच्या भूमिकेची चर्चा होती. तू 12 कोटी रुपये मानधन मागितलेस, इतर अभिनेत्रींनी तुला पाठिंबा दिला होता” असे करीनाला विचारण्यात आले. त्यावर करीनाने होकारार्थी मान हलवली आणि हे खरे आहे असे सांगितले.

नेटक-यांनी करीनाला केले होते ट्रोल
चित्रपटासाठी करीनाचे नाव पुढे आल्यानंतर नेटक-यांनी सोशल मीडियावर तिला ट्रोल करायला सुुरुवात केली होती. इतकेच नाही तर करीनावर बहिष्कार घालण्याची मागणीही होऊ लागली होती. सीता मातेच्या भूमिकेसाठी केवळ हिंदू अभिनेत्रीच हवी, असे नेटकरी म्हणाले होते. जर करीनाने माता सीतेची भूमिका साकारली तर तो हिंदू धर्म आणि माता सीतेचा अपमान होईल, असे काही नेटकरी म्हणाले होते. काहींनी करीनाला बॉयकॉट करण्याची मागणी केली. त्यामुळे सोशल मीडियावर #BoycottKareenaKhan ट्रेंड होताना दिसला होता.

चित्रपटात रावणाची भूमिका साकारु शकतो रणवीर
रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटातील रावणाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक अलौकिक देसाई यांनी रणवीर सिंहला अप्रोच केले आहे. रणवीरला भूमिका आवडली असल्याचेही सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...