आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफचा 51 वा वाढदिवस:करीना कपूरने मालदीवमधील फोटो शेअर करून पती सैफला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, सोबत तैमूर आणि जेह दिसले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालदीवमध्ये साजरा होतोय सैफचा वाढदिवस

अभिनेता सैफ अली खानचा आज (16 ऑगस्ट) 51 वा वाढदिवस आहे.यानिमित्ताने सध्या तो संपूर्ण कुटुंबासोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्याचे चाहते, मित्र आणि कुटुंबातील सदस्य सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, सैफची पत्नी करीना कपूर खानने मालदीवमधील खास फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हॅपी बर्थडे टू लव्ह ऑफ माय लाइफ : करीना
मालदीवमधील फोटो शेअर करत करीना कपूरने लिहिले, "हॅपी बर्थडे टू लव्ह ऑफ माय लाइफ. मला अनंतकाळ तुझ्याबरोबर राहायचे आहे," असे कॅप्शन करीनाने फोटोसह दिले आहे. करीनाने शेअर केलेल्या पहिल्या फोटो सैफ, करीना, तैमूर, जेह (जहांगीर) हे चौघेजण दिसत आहे. तर एका फोटोत सैफ आणि करीना स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत.

करीना आणि सैफ रविवारी कुटुंबासोबत मालदीवसाठी रवाना झाले. त्यांचे मुंबई विमानतळावरील काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जेह म्हणजेच करीनाचा लहान मुलगा जहांगीर याची ही पहिलीच परदेशची यात्रा आहे.

धाकटी बहीण सबाने दिल्या भाऊ सैफला वाढदिवसाच्या शुभेच्छा
करीना कपूरच्या या फोटोंवर कमेंट करताना मलायका अरोराने लिहिले - "माझ्या प्रिय सैफूला वाढदिवसाच्या शुभेच्छा." सैफ अली खानची बहीण सबा खानने लिहिले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा भाई. खूप प्रेम. सुरक्षित राहा." याशिवाय अनेक सेलेब्सनी सैफला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करिश्मा कपूर हिनेदेखील सैफला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करीना आणि सैफच्या कामाबद्दल सांगायचे म्हणजे करीना कपूर लवकरच आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. दुसरीकडे, सैफ लवकरच 'भूत पुलिस', 'आदिपुरुष', 'बंटी और बबली 2' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...