आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडवर कोरोनाचे सावट:अभिनेत्री कतरिना कैफला कोरोनाची लागण, सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कतरिना कैफ हिचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बॉलिवूडवर कोरोनाचे सावट बघायला मिळत आहे. अक्षय कुमार, गोविंदा, भूमी पेडणेकर आणि विकी कौशल यांच्या पाठोपाठ आता अभिनेत्री कतरिना कैफ हिलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिने स्वतःला आयसोलेट केले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कतरिनाने तिला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे.

कतरिनाने लिहिले, 'माझी कोविड 19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतःला आयसोलेट केले असून होम क्वारंटाइन आहे आणि सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे,' असे कतरिनाने सांगितले आहे. सोबतच संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुण घेण्याचे आवाहन तिने केले आहे. चाहत्यांना स्वतःची काळजी घ्या, असेही ती म्हणाली आहे.

सोमवारी भूमी पेडणेकर आणि विकी कौशलचा रिपोर्ट आला होता पॉझिटिव्ह

रविवारी अभिनेता अक्षय कुमारचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सोमवारी त्याला पवईस्थित हीरानंदानी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तर अभिनेता गोविंदालासुद्धा कोरोनाची हलकी लक्षणे आहेत. सोमवारी अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि विकी कौशल यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते.

भूमीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करत तिला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. तिने लिहिले, 'माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काही सौम्य लक्षण दिसून येत आहेत पण मी ठिक आहे. मी स्वतःला आयसोलेट केले असून डॉक्टर आणि वैद्यकिय जाणकारांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आहे. जर तुम्ही माझ्या संपर्कात आला असाल तर तातडीने करोना चाचणी करून घ्या.' असे भूमीने सांगितले आहे.

पुढे ती म्हणाली होती, 'वाफ घेणे, विटामिन सी, खाणे आणि आनंदी मूड असे सर्व सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या. सर्व काळजी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली. मास्क घाला. सॅनिटाइझरचा वापर करा, सुरक्षित अंतर राखा आणि सामाजिक भान राखा आणि काळजी घ्या,' अशी पोस्ट भूमीने लिहिली आहे.

दुसरीकडे विकी कौशल यानेदेखील सोशल मीडिया अकाउंटवरुन त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले होते. 'संपूर्ण काळजी घेऊनही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या,' अशा आशयाची पोस्ट विकीने केली आहे.

यापूर्वी अनेक सेलिब्रिटी अडकले कोरोनाच्या विळख्यात

यापूर्वी रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट, आमिर खान, आर माधवन, परेश रावल, मिलिंद सोमण, रोहित सराफ, सिद्धांत चतुर्वेदी, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन आणि सतीश कौशिक, फातिमा सना शेख, आदित्य नारायण आणि त्याची पत्नी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. रणबीर कपूर, कार्तिक आर्यन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कोरोनावर यशस्वी मात देखील केली आहे.

बातम्या आणखी आहेत...