आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणीत अभिनेत्री:दाक्षिणात्य अभिनेत्री काव्या थापरला मुंबईत अटक; दारु पिऊन गाडी चालवणे, दुसऱ्या वाहनाला धडक देणे आणि पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या अभिनेत्रीला गुरुवारी सकाळी जुहू परिसरातून पकडण्यात आले. अटकेनंतर तिला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काव्या थापरला मुंबईच्या जुहू पोलिसांनी अटक केली आहे. या अभिनेत्रीवर दारुच्या नशेत कार चालवून दुसऱ्या वाहनाला धडक दिल्याचा आरोप आहे. नशेत असताना महिला पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी अभिनेत्रीकडून कोणतेही स्पष्टीकरण समोर आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला गुरुवारी सकाळी जुहू परिसरातून पकडण्यात आले. अटकेनंतर तिला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हॉटेलबाहेर कारला मारली धडक
जुहू पोलिसांनी सांगितल्यानुसार, एका पंचतारांकित हॉटेलमधून बाहेर पडत असताना काव्याने एका कारला धडक मारली. कारच्या मालकाने तिला थांबवल्यावर तिने रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर जुहू पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. यानंतर नशेत असलेल्या काव्याने आधी अधिकाऱ्याला शिवीगाळ केली आणि नंतर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून तिला अटक केली. अटकेनंतर काव्याला मुंबईतील अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले. तेथून तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे काव्या
मुंबईत जन्मलेली काव्या दक्षिणेतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिने तामिळ आणि तेलुगू भाषेतील सुमारे अर्धा डझन चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय 'तत्काल' या शॉर्ट हिंदी चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. माया पेरेमिटो(तेलुगु), मार्केट राजा एमबीबीएस (तामिळ), एक मिनी कथा (तेलुगु) हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत. याशिवाय तिने अनेक मॉडेलिंग असाइनमेंट्सही केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...