आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनी निकामी झाल्याने रसिक दवे यांचे निधन:अभिनेत्री केतकी दवे यांच्या पतीचे निधन, दोन वर्षांपासून होते डायलिसिसवर

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'महाभारत'मध्ये त्यांनी नंदची भूमिका साकारली होती.

अभिनेते रसिक दवे यांचे शुक्रवारी वयाच्या 65 व्या वर्षी मूत्रपिंड निकामी झाल्याने निधन झाले. वृत्तानुसार, रसिक गेल्या दोन वर्षांपासून डायलिसिसवर होते. शनिवारी रसिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रसिक यांनी अनेक गुजराती नाटके आणि चित्रपट तसेच हिंदी टीव्ही शोमध्ये काम केले. 'महाभारत'मध्ये त्यांनी नंदची भूमिका साकारली होती.

दोन वर्षांपासून होते डायलिसिसवर

ETimes च्या रिपोर्टनुसार, "रसिक गेल्या काही वर्षांपासून किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते. गेल्या दोन वर्षांपासून ते डायलिसिसवर होते. गेल्या एका महिन्यात त्यांची प्रकृती बिघडली होती." लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री केतकी दवे या त्यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या पश्च्यात पत्नी केतकी दवे, एक मुलगी आणि एक मुलगा आहेत.

चाहत्यांनी वाहिली रसिक यांना श्रद्धांजली

रसिक यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एका चाहत्याने लिहिले, 'गुजराती थिएटर्सने त्यांचा स्टार गमावला आहे. रसिक भाई तुमची खूप आठवण येईल.' एका ट्विटर यूजरने लिहिले, 'देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.'

गुजराती इंडस्ट्रीत लोकप्रिय होते रसिक

रसिक यांची पत्नी केतकी दवे यांना लोकप्रिय टीव्ही शो 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मध्ये दक्षाच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. रसिक आणि केतकी हे दोघेही गुजराती चित्रपट आणि टीव्ही शोमधील प्रसिद्ध नाव आहेत. या जोडीने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे गुजराती थिएटर कंपनीचे मालक आहेत.

'पुत्र वधू' या गुजराती चित्रपटातून केली होती करिअरला सुरुवात

रसिक यांनी 1982 मध्ये 'पुत्र वधू' या गुजराती चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. 'संस्कार - धरोहर अपनो की' आणि 'महाभारत' सारख्या अनेक हिंदी शोमध्ये त्यांनी काम केले होते. रसिक आणि केतकी 2006 मध्ये डान्स रिअॅलिटी टीव्ही शो 'नच बलिये'मध्येही दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...