आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:अभिनेत्री खुशबू सुंदर यांच्या कारला भीषण अपघात, थोडक्यात बचावल्या; म्हणाल्या - मुरुगन देवाच्या कृपेने या अपघातातून वाचले

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वतः खुशबू यांनी ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे.

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर यांचा आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या गाडीचे गंभीर नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने त्या अपघातून बचावल्या असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. गाडीची अवस्था बघता हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येते. स्वतः खुशबू यांनी ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे.

खुशबू यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आमची गाडी योग्य लेनमधून जात होती. पण अचानक गाडीला एका टँकरने धडक दिली. हा अपघात मेलामरवाथुरजवळ घडला आहे. खुशबू सुंदर या वेल यात्री कार्यक्रमात भाग घेण्यासाठी कडलोर येथे जात होत्या.

यासोबतच खुशबू यांनी त्यांच्या समर्थकांचे आभार मानले. तसेच मुरुगन देवाच्या कृपेने त्या या अपघातातून बचावल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या अपघाताचा सध्या पोलिस तपास करत आहेत. कितीही संकटे आली तरी त्या कडलोर दौऱ्याला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अलीकडेच काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपात केला होता प्रवेश
अभिनेत्री ते राजकीय नेत्या असा प्रवास करणाऱ्या खुशबू सुंदर यांनी गेल्याच महिन्यात काँग्रेसला रामराम देऊन भाजपात प्रवेश केला होता. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्या म्हणाल्या होत्या की, 'कालांतराने मला समजले की, देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीची आवश्यकता आहे.'

काँग्रेस पक्षातील दिग्गजांवर लावले होते आरोप
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवताना त्यांनी पक्षातील दिग्गजांवर आरोप लावले होते. "पक्षामध्ये वरिष्ठ स्तरावरील काही व्यक्ती, ज्यांचा जमिनीवरील परिस्थितीशी काहीही संबंध नाही, ते निर्णय घेत आहेत. माझ्यासारख्या लोकांना पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करायचे आहे, पण आमचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न होतोय" असे खुशबू सुंदर यांनी पत्रात म्हटले होते.

2014 मध्ये केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश
खुशबू सुंदर सहा वर्षे काँग्रेसमध्ये होत्या. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यापूर्वी 2010 साली त्यांनी द्रमुकमध्ये प्रवेश केला होता.

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये केले आहे काम
खुशबू सुंदर या दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील मोठया स्टार आहेत. त्यांनी 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1980 मध्ये 'द बर्निंग ट्रेन' या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर त्या 'लावारिस' (1981), 'कालिया' (1981), 'नसीब' (1981), 'बेमिसाल' (1982), 'मेरी जंग' (1985), 'तन बदन' (1986) आणि 'दीवाना मुझसा नहीं' (1990) या चित्रपटांमध्ये झळकल्या.

बातम्या आणखी आहेत...