आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अभिनेत्रीचा भाजपात प्रवेश:राहुल गांधींच्या निकटवर्तीय अभिनेत्री खुशबू यांचा भाजप प्रवेश, सोनिया गांधींना राजीनामा देताना पक्षातील वरिष्ठ स्तरावरील व्यक्तींवर केले गंभीर आरोप

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खुशबू पहिल्या अशा अभिनेत्री आहेत, ज्यांच्या नावावर चाहत्यांनी तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे मंदिर बनवले.
  • 2014 मध्ये जेव्हा खुशबू यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता, तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, हा पक्ष देश एकत्र करू शकतो.

अभिनेत्री ते राजकीय नेत्या असा प्रवास करणाऱ्या खुशबू सुंदर यांनी काँग्रेसला रामराम देऊन भाजपात प्रवेश केला आहे. सोमवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्या म्हणाल्या की, 'कालांतराने मला समजले की, देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीची आवश्यकता आहे.'

काँग्रेस पक्षातील दिग्गजांवर लावले आरोप
राहुल गांधींच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणा-या खुशबू यांनी सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला होता. "पक्षामध्ये वरिष्ठ स्तरावरील काही व्यक्ती, ज्यांचा जमिनीवरील परिस्थितीशी काहीही संबंध नाही, ते निर्णय घेत आहेत. माझ्यासारख्या लोकांना पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करायचे आहे, पण आमचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न होतोय" असे खुशबू सुंदर यांनी पत्रात म्हटले होते.

2014 मध्ये केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश
खुशबू सुंदर सहा वर्षे काँग्रेसमध्ये होत्या. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यापूर्वी 2010 साली त्यांनी द्रमुकमध्ये प्रवेश केला होता. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना भाजपाकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये केले आहे काम
खुशबू सुंदर या दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील मोठया स्टार आहेत. त्यांनी 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1980 मध्ये 'द बर्निंग ट्रेन' या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर त्या 'लावारिस' (1981), 'कालिया' (1981), 'नसीब' (1981), 'बेमिसाल' (1982), 'मेरी जंग' (1985), 'तन बदन' (1986) आणि 'दीवाना मुझसा नहीं' (1990) या चित्रपटांमध्ये झळकल्या.