आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफिशिअल:टेनिस प्लेअर लिएंडर पेससोबत रिलेशनशिपमध्ये आहे किम शर्मा, सोशल मीडियावर केला खुलासा

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • किमने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री किम शर्मा आणि टेनिस प्लेअर लिएंडर पेस यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. पण आता या दोघांनीही सोशल मीडियावर त्यांच्या नात्याविषयी अधिकृत घोषणा केली आहे. या दोघांनी आता इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

फोटो शेअर केला
किमने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आणि लिएंडर एकत्र दिसत आहेत. लिएंडर तिच्याकडे प्रेमाने बघताना दिसत आहे. तर किम कॅमेऱ्याकडे बघून पोझ देत आहे. कॅप्शनमध्ये किमने काहीही लिहिलेले नाही. फक्त मुलगा आणि मुलीमधील प्रेमाचे इमोजी पोस्ट केले आहेत. किमने शेअर केलेला हा फोटो लिएंडरने आपल्या अकाउंटवर रिपोस्ट करत कॅप्शनमध्ये 'मॅजिक' असे लिहिले आहे.

किमच्या या पोस्टवर इंडस्ट्रीतील तिच्या मित्रांनी कमेंट केल्या आहेत. मॉडेल उज्ज्वला राउत आणि ज्वेलरी डिझायनर फराह खान यांच्यासह फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यापूर्वीही दिसले सोबत
याआधी लिएंडर आणि किमने जुलै महिन्यात गोव्यामध्ये एकत्र सुट्टी घालवली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याही फोटोंमध्ये त्या दोघांचा रोमँटिक अंदाज दिसून येत होता.

हर्षवर्धन राणेसोबत रिलेशनशिपमध्ये होती किम
किम शर्मा काही वर्षांपूर्वी हर्षवर्धन राणेसोबत रिलेशनमध्ये होती. त्यांची जोडीही चाहत्यांना आवडली होती. या दोघांचे नाते काही वर्षे टिकले. परंतु 2019 मध्ये दोघेजण वेगळे झाले. त्यांचे ब्रेकअप नेमके कशामुळे झाले याचे नेमके कारण समोर आलेले नाही.

घटस्फोटित आहे किम शर्मा
किम शर्मा कायमच तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. 2003 मध्ये किम आणि युवराज सिंग यांच्यात अफेअर असल्याची बातमी समोर आली होती. या दोघांचे अफेअर चार वर्ष सुरू होते. परंतु नंतर या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि त्यांचे नाते संपुष्टात आले. त्यानंतर किमने 2010 मध्ये उद्योगपती अली पुंजानीशी लग्न केले आणि ती मुंबई सोडून केनियाला गेली. त्यानंतर काही वर्षांनी तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी आली. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला.

किमचे करिअर
किमने यशराज फिल्म्सच्या 'मोहब्बतें' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानतंर ती तुम से अच्छा कौन, कहता है दिल बार, टॉम डिक और हॅरी, नेहले पे दहला या चित्रपटांमध्ये झळकली. तर लिएंडर पेस 2000 मध्ये मॉडेल रिया पिल्लईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. पण काही वर्षांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले. रिया आणि लिएंडर यांना एक मुलगी असून अयाना हे तिचे नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...