आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाते तुटले:कीर्ती कुल्हारीने पती साहिल सहगलपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला, सोशल मीडियावर केली घोषणा; 5 वर्षांपूर्वी झाले होते लग्न

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘उरी’ फेम अभिनेत्री होणार पतीपासून विभक्त!

‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने पती साहिल सहगलपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. कीर्तीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या या पोस्टमध्ये कीर्तीने ती आता पती साहिलपासून विभक्त होत आहे, असे म्हटले आहे. सोबतच यासंदर्भात आणखी काहीही भाष्य करु इच्छित नसल्याचेही ती म्हणाली आहे.

हा निर्णय घेणे सोपे नव्हते
कीर्तीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात लिहिले आहे की, ‘मी आणि माझे पती साहिल यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे मला सर्वांना सांगायचे आहे. आम्ही केवळ कागदावर नव्हे तर संपूर्ण आयुष्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कोणाबरोबर राहणे म्हणजे त्यापासून विभक्त होणे अधिक कठीण निर्णय आहे.’

कीर्तीने पुढे लिहिले, ‘जे आता आहे ते बदलता येत नाही. अशा परिस्थितीत, माझी काळजी वाटणाऱ्या सर्वांना मी सांगू इच्छिते की मी ठीक आहे. यानंतर मी यावर कोणत्याही प्रकारचे भाष्य करणार नाही’, असे कीर्ती म्हणाली आहे.

2016 मध्ये झाले होते कीर्ती आणि साहिलचे लग्न
एकत्र काम करत असताना कीर्ती आणि साहिलचे प्रेम प्रकरण सुरू झाले होते. दोघे एका जाहिरातीमध्ये एकत्र काम करत होते आणि येथूनच त्यांचे प्रेम सुरू झाले. दोन महिन्यांच्या डेटिंगनंतर कीर्तीने साहिलला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यानंतर 2016मध्ये या दोघांनी लग्न केले होते. आता लग्नाच्या 5 वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कीर्तीने 2010 मध्ये 'खिडची : द मुव्ही' द्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती ब-याच चित्रपटांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारताना दिसली. ​​​​​​​कीर्तीने ‘शैतान’, ‘पिंक’, ‘इंदू सरकार’, ‘ब्लॅकमेल’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘मिशन मंगल’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्यावर्षी ती 'क्रिमिनल जस्टिस' या वेब सीरिजमध्ये झळकली होती.

बातम्या आणखी आहेत...