आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृर्ती खरबंदा पुन्हा एकदा आगामी चित्रपट ‘14 फेरे’मध्ये नवरी बनताना दिसणार आहे. नुकतेच तिने दिव्य मराठीशी झालेल्या खास चर्चेत चित्रपटातील लग्न आणि खऱ्या आयुष्यात लग्न कधी करणार यावर गप्पा मारल्या..
बऱ्याच वेळा वधूची भूमिका साकारली. या चित्रपटात वधू होणे माझ्यासाठी एक आव्हान नव्हते, परंतु कोरोना काळात शूटिंगबद्दल मला नक्कीच काळजी वाटत होती. कार्यशाळेचा पहिला दिवस होता आणि त्याच दिवशी मला 104 डिग्री ताप आला. मला कोरोना झालाय की काय असे वाटत होते. नंतर ३ दिवस विलगीकरणात राहिले. मी एकटीच राहत असल्याने मला सर्वकाही करावे लागले. नंतर कोरोना नव्हे तर मलेरिया झाल्याचे मला कळाले. अशा परिस्थितीत 5 ते 6 दिवसांनी शूटिंग पुढे ढकलले. त्यानंतर लखनौमध्ये शूटिंग सुरू झाली, त्यानंतर ती खूप आजारी पडले.
जेव्हा लग्न करेल तेव्हा सर्वांनाच सांगेल. मी रिलेशनशिपही कधी लपवले नाही. त्यामुळे लग्न ठरले तर नक्कीच सर्वांना अभिमानाने सांगेल.
लग्न आणि त्यावर आधारित विषय माझ्यासाठी भाग्यवान ठरला, असे मला वाटते. दुसरे म्हणजे, लखनऊमध्ये माझ्या शूटिंग चांगले चालते. ’14 फेरे’साठीही आम्हाला लखनौमध्ये 40 दिवस शूट करावे लागले. मी वधू बनली खरी, मात्र मी 10 मिनिटाच्या वर त्या गेटअपमध्ये दिसणार नाही. बाकीचे पात्र मला अधिक सामर्थ्यवान वाटले म्हणून चित्रपट नाकारता आला नाही.
ऐतहिासिक भूमिका करायच्या आहेत. ‘वीरजारा’ सारखा चित्रपट करण्याची इच्छा आहे. गेल्या काही वर्षापासून माझ्या डोक्यात एक पात्र जाऊन बसले आहे, ते ऊर्मिला मातोंडकरच्या चित्रपटातील हसीनाचे पात्र. शिवाय मला टेनिस खेळाडूची भूमिका करायची आहे, कारण मी बालपणी टेनिसच खेळत होते. कारकीर्दीत एकदा तरी टेनिस खेळाडूची भूमिका साकारायची.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.