आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेरचा निरोप:मंदिरा बेदीने पती राज कौशल यांच्या पार्थिवाला दिला खांदा, पाणावलेल्या डोळ्यांनी दिला अखेरचा निरोप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पतीला अखेरचा निरोप देताना मंदिरा कोलमडून गेली होती.

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ह्दयविकाराचा झटक्याने राज कौशल यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी पहाटे साडे चार वाजता राज यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 11 वाजता त्यांच्या राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघाली. अनेक वर्षांच्या परंपरेला छेद देत मंदिरा बेदीने आपल्या पतीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी पतीला अखेरचा निरोप देताना मंदिरा कोलमडून गेली होती.

पतीचे अंत्यसंस्कार करत असतानाचे मंदिराचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात मंदिरा राज यांच्या पार्थिवाला खांदा देताना दिसतेय. या व्हिडिओमध्ये राज कौशल यांचे पार्थिव एका रुग्णवाहिकेमधून स्मशानभूमीकडे नेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

राज कौशल यांनी अभिनेता म्हणून केली होती करिअरची सुरुवात
राज यांनी अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी आपल्या कारकीर्दीत 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'अँथनी कौन है' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मंदिरा आणि राज यांचे 14 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न झाले होते. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गेल्या वर्षी राज आणि मंदिरा यांनी मुलगी ताराला दत्तक घेतले होते. मंदिरा आणि राज यांची पहिली भेट 1996 मध्ये मुकुल आनंद यांच्या घरी झाली होती. मंदिरा तेथे ऑडिशनसाठी गेली होती आणि राज हे मुकुल आनंदचे सहाय्यक म्हणून काम करत होते. येथूनच दोघांचे प्रेम सुरू झाले.

रोहित रॉयने व्यक्त केला होता शोक
राज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना रोहित बोस रॉयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि लिहिले होते, ' राज, माझा मित्र, माझा भाऊ... तू जिथे जायचा तिथे आनंद पसरवायचा. आम्ही सर्वजण तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि दुर्दैवाने पुढील आठवडा पुढील आठवडा म्हणत म्हणत आपली भेट होऊ शकली नाही. गुड बाय न म्हणतात तू निघून गेलाय. कसे व्यक्त व्हावे हेच कळत नाहीये,' अशा शब्दांत रोहितने दुःख व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...