आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन, हृदयविकाराच्या झटक्याने मालवली प्राणज्योत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहाटे साडे चार वाजता राज यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि चित्रपट निर्माते राज कौशल यांचे बुधवारी वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले. कुटुंबातील जवळच्या मित्राने राज यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. पहाटे साडेचार वाजता राज यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 27 जूनला राज आणि मंदिरा यांनी त्यांच्या मित्र परिवारासोबत पार्टी एन्जॉय केली होती. त्यानंतर राज यांच्या निधानाची अचानक बातमी आल्याने सर्वानाच मोठा धक्का बसला आहे.

अभिनेता म्हणून केली होती करिअरची सुरुवात
राज यांनी अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी आपल्या कारकीर्दीत 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'अँथनी कौन है' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मंदिरा आणि राज यांचे 14 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न झाले होते. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गेल्या वर्षी राज आणि मंदिरा यांनी मुलगी ताराला दत्तक घेतले होते. मंदिरा आणि राज यांची पहिली भेट 1996 मध्ये मुकुल आनंद यांच्या घरी झाली होती. मंदिरा तेथे ऑडिशनसाठी गेली होती आणि राज हे मुकुल आनंदचे सहाय्यक म्हणून काम करत होते. येथूनच दोघांचे प्रेम सुरू झाले.

रोहित रॉयने व्यक्त केला शोक
राज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना रोहित बोस रॉयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, ' राज, माझा मित्र, माझा भाऊ... तू जिथे जायचा तिथे आनंद पसरवायचा. आम्ही सर्वजण तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि दुर्दैवाने पुढील आठवडा पुढील आठवडा म्हणत म्हणत आपली भेट होऊ शकली नाही. गुड बाय न म्हणतात तू निघून गेलाय. कसे व्यक्त व्हावे हेच कळत नाहीये,' अशा शब्दांत रोहितने दुःख व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...