आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अलविदा:मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचे वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी  निधन, कीटो डाएट घेतल्यामुळे बिघडली होती तब्येत

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी रात्री झाले मिष्टी मुखर्जीचे निधन

हिंदी आणि बंगली चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचे 2 ऑक्टोबरच्या रात्री दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, कीटो डाएट घेतल्यामुळे तिची तब्येत ढासळली होती. ती अवघ्या 27 वर्षांची होती. निधनानंतर शनिवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मिष्टीच्या निकटवर्तीयाने आपल्या निवेदनात म्हटले की, 'ब-याच चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये आपली कला दाखविणारी अभिनेत्री मिष्टी मुखर्जी आता आपल्यात नाही. कीटो डायटमुळे तिचे मूत्रपिंड निकामी झाले आणि बंगळूरु येथे शुक्रवारी रात्री तिने अखेरचा श्वास घेतला. तिला अखेरच्या क्षणी खूप वेदना झाल्या. तिची पोकळी भरून न निघणारी आहे. तिच्या आत्म्याला शांती लाभो. तिच्या मागे आईवडील आणि भाऊ आहेत. '

जूही चावलाच्या चित्रपटात झळकली होती
मिष्टीने 2012 मध्ये 'लाइफ की तो लग गई' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर, 2013 मध्ये मैं कृष्णा हूं या चित्रपटातील एका गाण्यात ती रजनीश दुग्गलसोबत दिसली होती. या चित्रपटात जूही चावला मुख्य भूमिकेत होती. तर हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा स्पेशल अपिअरन्स होता. याशिवाय मिष्टी काही आयटम नंबरमध्येही दिसली. हिंदी व्यतिरिक्त तिने बंगाली आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले होते.

सेक्स रॅकेट चालवण्याचा लागला होता आरोप

2014 मध्ये मिष्टीवर हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवल्याचा आरोप लागला होता. तिच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यात अनेक सीडी आणि टेप्स जप्त करण्यात आल्या होत्या.

निधनावर कश्मिरा शहाने व्यक्त केला शोक
मिष्टीच्या निधनावर अभिनेत्री कश्मिरा शहा हिने ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला. कश्मिराने लिहिले की, 'खूप लवकर निघून गेलीस, तरुण मिष्टी मुखर्जी RIP.'

कीटो डाएट म्हणजे काय?

वजन कमी करण्यासाठी केटोजेनिक आहार (कीटो डाएट) वापरला जातो. हा मध्यम प्रथिने, कमी कार्बोहायड्रेट आहार आहे. एक्सपर्ट्सनुसार अधिक प्रमाणात कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्लाने शरीरातील ग्लुकोज आणि इन्शुलिन अधिक प्रमाणात उत्पन्न होते. ज्यामुळे शरीरात फॅट्स जमा होऊ लागतात आणि वजन वाढते. तर कीटो डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचे सेवन कमी केल्यामुळे फॅट्सपासून एनर्जी निर्माण होते. जी वजन कमी करण्यास मदत करते. एका परफेक्ट किटो डाएटमध्ये 70 टक्के फॅट, 25 टक्के प्रोटीन आणि 5 टक्के कार्बोहायड्रेट यांचा समावेश केला जातो.

बातम्या आणखी आहेत...