आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन की बात:मृणाल ठाकूरने 8 वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले, म्हणाली - 'तूफान' माझ्यासाठी एखाद्या ड्रीम प्रोजेक्टसारखा

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृणाल म्हणेत - माझ्यासाठी हे एखाद्या ड्रीम प्रोजेक्टसारखे आहे.

आठ वर्षांपूर्वी आलेला दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा 'भाग मिल्खा भाग’ पाहिल्यानंतर मृणाल ठाकूरने त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता मृणाल त्यांच्या आगामी 'तूफान’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे, तिच्यासोबत 'भाग मिल्खा भाग’मधील मुख्य कलाकार फरहान अख्तरदेखील आहे. दोघांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मृणाल स्वत:ला भाग्यवान समजते.

मृणाल म्हणते, "मी कॉलेजला असताना 'भाग मिल्खा भाग’ सिनेमा आला होता आणि मी तो थिएटरमध्ये पाहायला एकटीच गेले होते. त्यानंतर मी एक मोठा लेख लिहिला होता, राकेश सर एकदा तरी पाहतील असा विचार करत होते. त्यावेळी मला माहीत नव्हते मी अभिनेत्री बनणार आणि त्यांच्यासोबत काम करणार. माझ्यासाठी हे एखाद्या ड्रीम प्रोजेक्टसारखे आहे. विशेष म्हणजे यात माझ्यासोबत फरहान आणि राकेश सर दोन्ही आहेत."

‘तूफान’मध्ये मिळाली मराठी भाषेत बोलण्याची संधी
‘तूफान’मध्ये मृणालने अनन्या नावाच्या मराठी मुलीची भूमिका वठवली आहे. या स्पोर्ट्स ड्रामामध्ये मृणाल आपली मातृभाषा मराठीमध्ये बोलण्याची संधी दिली आहे. याविषयी बोलताना मृणाल म्हणाली, 'सर्वात चांगली गोष्ट ही आहे की अनन्या आणि मी दोघीही महाराष्ट्रातील आहोत. तुम्ही मला या चित्रपटातमध्ये मराठी बोलताना पाहाल आणि ते नैसर्गिकरित्या ओघात आलेले आहे. जेव्हा तुमच्यासोबत परेश सरांसारखे कलाकार असतात जे मराठीत प्रतिक्रिया देतात, तेव्हा ती एक छान संवादाची आणि मजेची जागा बनून जाते.'

पुढे मृणाल सांगते, 'माझी व्यक्तिरेखा अनन्या ना केवळ अज्जू (फरहान अख्तर)च्या जीवनात, परंतु त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनात देखील प्रेरक आहे. ती खूप उदार, समर्पित आणि दूरदृष्टी असलेली मुलगी आहे. ऑफ स्क्रीन, मी अनन्याकडून प्रेरित आहे आणि ज्या तऱ्हेने ती गोष्टी बघते. अनन्याचा समानतेवर विश्वास आहे आणि जीवनातील तिचे उद्द्येष्य लोकांना प्रेरित करणे हे आहे.'

‘तूफान’ची निर्मिती रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांनी केली आहे. खेळावर आधारित या सिनेमाचा प्रीमियर अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 21 मे रोजी होईल.

बातम्या आणखी आहेत...