आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हिडीओ:73 वर्षीय मुमताज यांनी व्हिडीओ शेअर करुन निधनाच्या अफवांना दिला पूर्णविराम, म्हणाल्या - 'बघा माझं निधन झालेलं नाही, मी जिवंत आहे...'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेव्हा मी मरेन, तेव्हा माझे कुटुंब अधिकृतपणे जाहिर करतील, असे मुमताज एका मुलाखतीत म्हणाल्या आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी त्यांच्या निधनाबद्दल पसरलेल्या अफवांवर दु:ख व्यक्त केलं आहे. गेल्या आठवड्यात त्यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला. आता मुमताज यांची मुलगी तान्याने त्यांचा एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात स्वतः मुमताज दिसत असून त्या मी मेले नसून जिवंत आहे, असं सांगताना दिसत आहेत. 

या व्हिडीओमध्ये मुमताज म्हणतात की, “माझ्या चाहत्यांना माझं प्रेम. बघा माझं निधन नाही झालंय. मी जिवंत आहे आणि काही म्हणतात तशी म्हातारी पण दिसत नाही. अजूनही प्रेझेंटेबल दिसत आहे.” हा व्हिडीओ करून मुमताज यांनी त्यांच्या निधनाच्या अफवांना पुर्णविराम दिला आहे. 

यासोबत त्यांनी एका इंग्रजी वेबसाइटला यासंदर्भात एक मुलाखत देऊन तीव्र प्रतिक्रियादेखील व्यक्त केली आहे. जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझे कुटुंब अधिकृतपणे जाहिर करतील, असे त्या या मुलाखतीत म्हणाल्या आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांचा भाचा शाद रंधावा आणि बहीण मल्लिका मुंबईत राहतात. लोकांनी कमीतकमी त्यांच्याकडून खात्री करुन घ्यायला हवी. "जेव्हा मी मरेन, तेव्हा माझे कुटुंब अधिकृतपणे जाहिर करतील. हे एखादे सिक्रेट राहणार नाही. ही बातमी सर्वत्र असेल", असं त्या म्हणाल्या. 

मुमताज आता 73 वर्षांच्या असून आजही त्या पूर्वी इतक्याच चार्मिंग दिसतात
मुमताज आता 73 वर्षांच्या असून आजही त्या पूर्वी इतक्याच चार्मिंग दिसतात

दरवर्षी विविध कलाकारांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत असतात. यात मुमताज यांचंही नाव असतं. त्यांच्या निधनाची बातमी पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागला आहे. आता हा व्हिडीओ शेअर करून मुमताज यांनी त्यांच्या निधनाच्या अफवांना पुर्णविराम दिला आहे.  

बातम्या आणखी आहेत...