आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज घेताना पकडली गेली अभिनेत्री:अभिनेत्री नायरा शाहला चरसचे सेवन केल्याच्या आरोपाखाली अटक, कोर्टात हजर केल्यानंतर मिळाला जामीन

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नायरा शाहला तिच्या एका मित्रासह अटक करण्यात आली.

अभिनेत्री नायराने तेलुगू चित्रपट मिरुगा, बुर्रा कथा आणि ई-ई या चित्रपटात काम केले आहे. मुंबईच्या जुहू भागात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी तेलुगू अभिनेत्री नायर शाह आणि तिचा मित्र आशिक साजिद हुसेन याला अटक केली. परवानगी न घेता हॉटेलच्या खोलीत वाढदिवसाची पार्टी करणे आणि पार्टीत ड्रग्जचे सेवन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नायराने मीरूगा, बुर्रा कथा आणि ई-ई या तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सांताक्रूझ पोलिस स्टेशनला मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी अभिनेत्री नायर शाहचा वाढदिवस होता आणि ती हॉटेलच्या एका खोलीत आपल्या दोन मित्रांसह पार्टी करत होती. हॉटेलच्या खोलीत ड्रग्ज पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर छापा टाकून रोल केलेल्या चरसच्या सिगारेटसोबत अभिनेत्रीला अटक करण्यात आली.

मेडिकलमध्ये ड्रग्जच्या पुष्टीमुळे अडचणी वाढू शकतात
रविवारी रात्री पडलेल्या या छाप्यानंतर सोमवारी सकाळी नायरा शाहची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर, जर अभिनेत्रीच्या शरीरात निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त ड्रग्ज सापडले तर तिच्या अडचणी वाढू शकतात. एका पोलिस अधिका-याने सांगितले की, छापा दरम्यान हे तिघेही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करत अंमली पदार्थांचे सेवन करीत होते.

कोर्टाने जामीन मंजूर केला
सांताक्रूझ पोलिस स्टेशनच्या अधिका-याने सांगितले की, एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक झाल्यानंतर दोघांनाही सोमवारी दुपारी स्थानिक वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले. तेथून कोर्टाने त्यांना जामिनावर सोडले आहे. गोव्यातील आणखी एक व्यक्ती जो त्यांच्यासमवेत तिथे हजर होता, तो छापा पडल्यानंतर तेथून पळून गेला. सध्या त्याचा शोधही सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...