आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या बेडीत अडकले नयनतारा-विघ्नेश:वेडिंग फोटो शेअर करत नयनतारा म्हणाली - नवी सुरुवात, 10 जून रोजी होणार रिसेप्शन

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा वेडिंग फोटो-

आज टॉलिवूडमध्ये सनई चौघड्याचे सूर घुमले. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा तिचा प्रियकर आणि दिग्दर्शक विघ्नेश सिवन याच्यासोबत आज म्हणजेच 9 जून रोजी लग्नबंधनात अडकली आहे. लग्नानंतर नयनतारा आणि विघ्नेश यांनी लग्नाचे निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नाचे फोटो शेअर करत नयनताराने त्याला कॅप्शन दिले, नवीन सुरुवात...

या लग्नात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, रजनीकांत, कमल हासन, दिग्दर्शक एटली यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली. नववधूच्या रुपात नयनताराचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. रेड कलरच्या साडीत असलेल्या नयनतारावरुन नजरच हटत नाही.

रेड कलरच्या साडीत असलेल्या नयनतारावरुन नजरच हटत नाही.
रेड कलरच्या साडीत असलेल्या नयनतारावरुन नजरच हटत नाही.
दाक्षिणात्य पद्धतीने नयनतारा आणि विघ्नेश यांचे लग्न लागले.
दाक्षिणात्य पद्धतीने नयनतारा आणि विघ्नेश यांचे लग्न लागले.
नयनताराच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना विघ्नेश
नयनताराच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना विघ्नेश
सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत नयनताराने याला 'मिसेस' असे कॅप्शन दिले आहे.
सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत नयनताराने याला 'मिसेस' असे कॅप्शन दिले आहे.
नयनताराने पती विघ्नेशचा हा फोटो शेअर करत त्याच्यासमोर लग्नाची तारीख म्हणजे 9.6.22 लिहिले आहे.
नयनताराने पती विघ्नेशचा हा फोटो शेअर करत त्याच्यासमोर लग्नाची तारीख म्हणजे 9.6.22 लिहिले आहे.
या फोटोला नयनताराने नवीन सुरुवात असे कॅप्शन दिले आहे.
या फोटोला नयनताराने नवीन सुरुवात असे कॅप्शन दिले आहे.

नयनतारा आणि विघ्नेश यांचे लग्न चेन्नईजवळील महाबलीपुरम येथील एका रिसॉर्टमध्ये पार पडले. 10 जून रोजी येथेच रिसेप्शनही ठेवण्यात आले आहे. या रिसेप्शनला साऊथ इंडस्ट्रीसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...