आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्ह्यू:पंकज कपूरपासून घटस्फोटाच्या 36 वर्षानंतर शाहिद कपूरच्या आईने सोडले मौन, नीलिमा म्हणाल्या, 'विभक्त होण्याचा निर्णय माझा नव्हता'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1984 मध्ये पंकज कपूर आणि नीलिमा यांटा घटस्फोट झाला होता. त्यावेळी शाहिद केवळ तीन वर्षांचा होता.

अभिनेता शाहिद कपूरचे आईवडील म्हणजे नीलिमा अजीम आणि पंकज कपूर यांच्या घटस्फोटाला 36 वर्षांचा काळ लोटला आहे. एवढ्या वर्षांनी पहिल्यांदाच नीलिमा अजीम घटस्फोट आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आलेल्या बदलांविषयी एका मुलाखतीत बोलल्या. 

नीलिमा यांच्या मर्जीने घटस्फोट झाला नव्हता : नीलिमा म्हणाल्या, 'विभक्त होण्याचा निर्णय माझा नव्हता. मला पकंज कपूर यांच्यापासून वेगळे व्हायचे नव्हते. मात्र ते आयुष्यात खूप पुढे निघून गेले होते आणि ती गोष्ट पचवणे माझ्यासाठी सोपे नव्हते.  जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा ते दोघांसाठीही खूप कठीण आणि वेदनादायक होते.  मी 15 वर्षांची असल्यापासून त्यांना ओळखत होती. आमच्यात खूप चांगली मैत्री होती. मात्र घटस्फोटासाठी त्यांच्याकडे योग्य ती कारणे होती आणि मीसुद्धा नंतर त्याचा स्वीकार केला.”

1975 मध्ये झाले होते लग्न :

नीलिमा आणि पंकज यांनी 1975 मध्ये केले पण 9 वर्षानंतर म्हणजे 1984 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यावेळी शाहिद केवळ तीन वर्षांचा होता. नीलिमा यांनीच शाहिदचे संगोपन केले.

नीलिमा म्हणाल्या, घटस्फोटानंतर मी माझे मित्र आणि कुटूंबाच्या मदतीने स्थिरस्थावर झाले. मोठा झाल्यानंतर शाहिद माझी सर्वात मोठी ताकद बनला. जगण्यावर विश्वास कसा ठेवायचा हे मी त्याच्याकडून शिकले. घटस्फोटातून बाहेर पडायला वेळ लागला पण शाहिदमुळे ते शक्य झाले, त्यानेच मला मनापासून साथ दिली. घटस्फोट खूप त्रासदायक होता. पण शाहिदमुळे मी त्यातून बाहेर पडले. 

पंकज यांनी केले दुसरे लग्न :

घटस्फोटानंतर पंकज कपूर यांनी 1989 मध्ये अभिनेत्री सुप्रिया पाठकशी दुसरे लग्न केलेय पंकज-सुप्रिया यांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव रुहान कपूर आणि मुलीचे नाव सना कपूर आहे. सनाने 'शानदार' चित्रपटात शाहिद आणि पंकज कपूर यांच्यासोबत काम केले आहे.  

नीलिमा यांचे दुसरे लग्नही मोडले :

1990 मध्ये नीलिमा यांनी अभिनेता राजेश खट्टरशी लग्न केले पण हे लग्नही फार काळ टिकले नाही. 2001 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या दोघांचा एक मुलगा असून ईशान खट्टर त्याचे नाव आहे. 1995 मध्ये ईशानचा जन्म झाला होता. घटस्फोटानंतर राजेश खट्टर यांनी अभिनेत्री वंदना सजनानीसोबत 2007 मध्ये लग्न केले. या दोघांचाही आता एक मुलगा आहे.   

ईशानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असूूून माजिद मजीदी यांच्या बियॉन्ड द क्लाऊड्स या चित्रपटात तो झळकला होता. ईशानसुद्धा त्याच्या आईसोबतच राहतो. 

तिसरे लग्नही टिकले नाही:

राजेश खट्टरपासून घटस्फोटानंतर नीलिमा यांनी उस्ताद रझा अली खानसोबत 2004 मध्ये तिसरे लग्न केले होते. परंतु हे नातेही फार काळ टिकले नाही आणि दोघे 2009 मध्ये विभक्त झाले.   

बातम्या आणखी आहेत...