आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:नीना गुप्तांनी सांगितले - गरोदर असताना एका खास मित्राने 'गे' व्यक्तीशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गरोदर असताना एका खास मित्राने 'गे' व्यक्तीचे लग्नाचे प्रपोज आणले होते

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी अलीकडेच त्यांचे आत्मचरित्र 'सच कहूं तो' प्रकाशित केले आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्या खासगी आयुष्यातील बरेच असे उलगडे केले आहेत ज्याबद्दल आजपर्यंत कोणालाच काही माहीत नव्हते. या पुस्तकात त्यांनी कुमारी माता आणि प्रेग्नेंसीच्या वेळी आलेल्या आव्हानांविषयी सांगितले आहे. नीना यांनी आपल्या पुस्तकात खुलासा केला की, जेव्हा त्या क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्या मुलीची आई होणार होत्या त्यावेळी त्यांच्या एका खास मित्राने त्यांना 'गे' व्यक्तीशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता.

नीना गुप्ता यांनी आपल्या सच कहूं तो या पुस्तकात वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबतच्या रिलेशनशिपचाही उल्लेख आहे. नीना विवियन यांच्या प्रेमात होत्या आणि त्यांच्यापासून त्यांना दिवस गेले होते. विवियन त्यांची पत्नी आणि कुटुंबाला सोडण्यासाठी तयार नव्हते. त्यामुळे नीना यांनी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता.

गरोदर असताना एका खास मित्राने 'गे' व्यक्तीचे लग्नाचे प्रपोज आणले होते
नीना यांनी आपल्या पुस्तकात खुलासा करताना लिहिले, 'जेव्हा मी मसाबाच्या वेळी प्रेग्नेंट होते तेव्हा माझा खास मित्र सुजॉय मित्राने माझ्यासाठी लग्नाचा एक प्रस्ताव आणला होता. तो मुलगा बँकर होता, वांद्रे येथे त्याचे घर होतं. नंतर समजले की तो 'गे' होता आणि कुटुंबीयाच्या दबावाखाली येऊन लग्न करत होता. माझ्या बाळाला स्वतःचे नाव देण्यास तो तयार होता, पण तो माझी किंवा माझ्या बाळाची कोणतीही जबाबदारी घेणार नसल्याचे त्याने स्पष्ट शब्दात सांगितले होते.'

फक्त वादांपासून वाचण्यासाठी लग्न करायचे नव्हते
एका मुलाखतीत नीना याविषयी म्हणाल्या होत्या, 'मला माझ्या मित्राच्या या प्रपोजलवर हसू आले होते. कारण फक्त वादांपासून वाचण्यासाठी लग्न करणे मला योग्य वाटत नव्हते. अभिनेत्री असल्याने मला मोठ्या कठीण परिस्थितीतून जावे लागणार आणि अनेकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार हे माहीत होते. पण मी निश्चय केला होता. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी हे सैल कपड्यांच्या मागे लपवून ठेवेन.'

सतीश कौशिक यांनी घातली होती लग्नाची मागणी
नीना गुप्ता यांनी आपल्या पुस्तकात अभिनेता सतीश कौशिक यांनी घातलेल्या लग्नाच्या मागणीचाही उल्लेख केला आहे. मसाबाच्या वेळी गरोदर असताना सतीश कौशिक यांनी नीना यांना लग्नाची मागणी घातली होती. नीना प्रेग्नेंट असतानाही सतीश यांनी त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. याविषयी नीना यांनी पुस्तकात सांगितले, 'त्यावेळी सतीश मला म्हणत असे, जर हे बाळ डार्क स्कीन घेऊन जन्माला आले तर तू हे सतीश कौशिकचे बाळ आहे असे सर्वांना सांगू शकतेस.' पण नीना यांनी सतीश यांचा हा प्रस्ताव नाकारला होता.

बातम्या आणखी आहेत...