आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीना यांनी ट्रोलर्सची बोलती केली बंद:गुलजार साहेबांच्या भेटीला शॉर्ट्स परिधान करुन गेलेल्या नीना गुप्ता झाल्या ट्रोल, ट्रोल करणा-यांना म्हणाल्या - 'मी या 2-4 लोकांना महत्त्व का देऊ? '

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेटकरी म्हणाले - गुलजार साहेबांसमोर साडी नेसून जायला हवे होते

अभिनेत्री नीना गुप्ता गेल्या काही दिवसांपासून आपल्या 'सच कहूं तो' या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहे. या पुस्तकात नीना यांनी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. दोन दिवसांपूर्वी नीना यांनी प्रसिद्ध गीतकार आणि लेखक गुलजार साहेब यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांना हे पुस्तक भेट म्हणून दिले. मात्र यावेळी त्यांनी परिधान केलेल्या शॉर्ट्समुळे नेटक-यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. नुकत्याच एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

जेव्हा माझे कौतुक करणारे जास्त लोक असताना मी या 2-4 लोकांना का महत्व देऊ?
नीना यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या आपले पुस्तक गुलजार यांना भेट म्हणून देताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये नीना ब्लू शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहेत. त्यांच्या या ड्रेसिंगवरुनच नेटक-यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

याच विषयावर एका मुलाखतीत बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या, 'जेव्हा मला ट्रोल केले गेले असे म्हटले जाते तेव्हा ट्रोलिंगची नेमकी परिभाषा काय समजावी? याचा अर्थ असा नाही की अनेकजण तुमची टीका करत आहेत. तुम्ही पहा अनेक जणांकडून माझे कौतुक करण्यात आले आहे. त्यामुळे मी या 2-4 लोकांची काळजी करणे गरजेचे आहे का?'

जेव्हा नीना यांना विचारले गेले की, त्यांच्यावर टीका करणा-यांना त्यांना काही सांगायचे आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या, 'कशाला? माझे कौतुक करणारे बरेच लोक असताना मी या 2-4 लोकांना का महत्व देऊ?' असे त्या म्हणाल्या आहेत.

गुलजार साहेबांसमोर साडी नेसून जायला हवे होते
नीना यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटक-याने त्यांना उद्देशून म्हटले की, 'असे कपडे परिधान करुन तुम्ही गुलजार साहेबांसमोर जायला नको होते.' तर आणखी एक नेटकरी म्हणाला की, 'गुलजार साहेबांच्या भेटीदरम्यान तुम्ही साडी नेसून जायला हवे होते. माफ करा, कारण गुलजार साहेब हे गुलजार साहेब आहेत.' आणखी एक नेटकरी नीना गुप्तांना म्हणाला की, "आपले वय बघा. वयानुसार वागा." अशा शब्दांत नेटक-यांनी नीना गुप्ता यांच्यावर निशाणा साधला होता.

नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ
नीना गुप्ता यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर गुलजार यांच्या भेटीचा एक व्हिडिओ शेअऱ केला. या व्हिडिओत नीना गुप्ता गुलजार यांना पुस्तक भेट म्हणून देताना दिसत आहेत. यावेळी नीना गुप्ता यांनी गुलजार यांना ‘पुस्तक वाचाल ना’ असा प्रश्नही विचारला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, 'खूप आनंदी आहे आणि थोडी चिंतेतही की त्यांना माझे पुस्तक आवडेल की नाही?'

नीना यांनी आत्मचरित्रात आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले
नीना यांनी आपल्या आत्मचरित्रात बालपणापासून ते आत्तापर्यंतच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींबद्दल सांगितले आहे. या पुस्तकात त्यांनी आपले कुटुंब, मित्र, करिअर, लग्न, प्रेम प्रकरण आणि मुलगी मसाबा हिचे संगोपन कसे केले, याविषयी लिहिले आहे. याशिवाय त्यांनी बॉलिवूडमधील आपल्या अनुभवांचा उल्लेखही या पुस्तकात केला आहे. यासह त्यांनी आपल्या आत्मचरित्रात बी-टाउन पॉलिटिक्स, कास्टिंग काउच यावरही प्रकाश टाकला आहे.

मुलगी मसाबासोबत 'मसाबा-मसाबा 2' मध्ये दिसणार आहेत नीना
नीना यांच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे, अलीकडेच त्या 'सरदार का ग्रँडसन' या चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटात त्यांनी 90 वर्षीय वृद्धेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर त्याच्या नातवाच्या भूमिकेत दिसला आहे. याशिवाय रकुल प्रीत सिंह हिचीदेखील महत्त्वाची भूमिका या चित्रपटात आहे. याशिवाय नीना लवकरच 'गुडबाय', '83', 'डायल 100' आणि 'ग्वालियर' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या सर्व चित्रपटांव्यतिरिक्त नीना त्यांची मुलगी मसाबासह 'मसाबा-मसाबा' या वेब सीरिजच्या दुसर्‍या पर्वातही झळकणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...