आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही जगतातून वाईट बातमी:प्रसिद्ध अभिनेत्री नीलू कोहली यांच्या पतीचे निधन, राहत्या घरात बाथरुममध्ये आढळला मृतदेह

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री निलू कोहली यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पती हरमिंदर सिंग कोहली यांचे शुक्रवारी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. त्यांची प्रकृती बरी होती. मात्र शुक्रवारी दुपारी गुरुद्वारातून घरी परतल्यानंतर ते बाथरूममध्ये गेले आणि तिथेच कोसळले. त्यावेळी घरात फक्त मदतनीस हजर होता. तो बाथरूममध्ये गेला असता हरमिंदर बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मैत्रिणीने सांगितले नेमेक काय घडले?
नीलू कोहली यांची जिवलग मैत्रीण वंदना अरोरा यांनी ही दुःखद बातमी दिली. त्यांनी सांगितले "शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हरमिंदर सकाळी गुरुद्वारात गेले होते आणि तेथून परतल्यानंतर ते बाथरूममध्ये गेले आणि तिथेच कोसळले. त्यावेळी त्यांच्यासोबत घरात फक्त एक मदतनीस होता. तो पण जेवणाची तयारी करत होता. पण बराच वेळ हरमिंदर बाहरे आले नसल्याने ते झोपायला गेले असावे असे त्याला वाटले. पण, ते तिथेही नव्हते, मग त्याने बाथरूममध्ये बघितले. त्यांनी बाथरूमचा दरवाजा लॉक केला नव्हता. त्या मदतीनसने आत पाहिले असता ते मृतावस्थेत पडला होते. हरमिंदर यांना मधुमेह होता, पण त्यांची प्रकृती ठणठणीत होती. ही दुर्दैवी घटना अचानक घडली."

रविवारी होणार अंत्यसंस्कार
नीलू कोहली यांचा मुलगा बाहेरगावी असल्याने तो आल्यावर रविवारी हरमिंदर सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान, नीलू कोहली या प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यानंतर आतापर्यंत अनेक मालिका व चित्रपटांमध्ये सहायक भूमिका साकारल्या आहेत. नीलू कोहली 1999 मध्ये आलेल्या 'दिल क्या करे' या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत झळकल्या होत्या. त्यांनी 'निम्मो ते विम्मो' या पंजाबी मालिकेतही काम केले होते. 'जय हनुमान' या हिंदी मालिकेतही त्या झळकल्या. 'हिंदी मीडियम', 'हाऊसफुल 2' आणि 'रन' या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे.