आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननची धाकटी बहीण नुपूर सेननने मंगळवारी 'फिलहाल 2'च्या सेटवर अभिनेता अक्षय कुमारसोबत आपला वाढदिवस साजरा केला. आपल्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो नुपूरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबतच अक्षय कुमारसोबत आगामी 'फिलहाल 2' या गाण्याचे शूटिंग करत असल्याचेही तिने सांगितले. यापूर्वी नुपूर आणि अक्षय हे 2019 मध्ये 'फिलहाल' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसले होते. हे गाणे देखील बी प्राकने गायले होते.
नुपूरने फोटो शेअर करत लिहिले की, 'एक कलाकार म्हणून माझा पहिला वर्किंग बर्थडे आहे. माझे मन पूर्ण भरले आहे. मी आज कॅमे-यासमोर आहे आणि माझ्यासाठी वाढदिवसाची यापेक्षा आणखी चांगली भेट असू शकत नाही. आजपासून 'फिलहाल 2'चा प्रवास सुरू होत आहे,' अशा आशयाची पोस्ट नुपूरने शेअर केली.
अक्षयने जानेवारी 2020 मध्येच या गाण्याची घोषणा केली होती. पण कोरोनामुळे या गाण्याचे शूटिंग रद्द करण्यात आले होते.
नुपूरच्या वाढदिवशी तिची बहीण कृती सेनन हिनेदेखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.