आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन की बात:अभिनेत्री परिणीती चोप्राला वाटतेय  ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ची काळजी वाटतेय, जाणून घ्या काय आहे यामागचे कारण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट येत्या 26 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय.

परिणीती चोप्राचा आगामी चित्रपट ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ आयएमडीबीवरील वर्षाचा सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपट ठरला आहे. या ऑनलाइन व्यासपीठाचे रेटिंग प्रेक्षकांच्या मतांवर आधारित आहे, त्यामुळे परिणीती चोप्रा खुश आहे. लोक तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आपला चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करेल याची तिला खात्री आहे. या चित्रपटाच्या आगामी ट्रेलरचा टीझर आलेल्या सिनेमापेक्षा जास्त परिणामकारक ठरेल, अशी तिला आशा आहे.

या चित्रपटाविषयी परिणीती म्हणाली, या सिनेमाची मला काळजी वाटत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आणि चित्रपट पाहिल्यानंतरही, लोकांनी टीझरला जितके प्रेम दिले तितकेच चित्रपटाला द्यावे, मला एवढीच आशा आहे.

अशी आहे चित्रपटाची कथा
ही कहाणी एका घटस्फोटित तरुणीची आहे, जी लंडनमध्ये राहाते. ती रोज ट्रेनने आपले ऑफिस आणि नव्या घरापर्यंतचा प्रवास करते. योगायोगाने ट्रेन तिच्या जुन्या घरापासूनच जाते, जिथे तिचा पुर्वाश्रमीचा पती त्याची दुसरी बायको आणि मुलांसोबत राहातो. एक दिवस प्रवासादरम्यान ती तरुणी ते काहीतरी पहाते जे तिला हैरान करून सोडते. चित्रपट याच घटनेबद्दल आहे. यापूर्वी, 2016 मध्ये याच नावाचा याच कथेवर आधारित हॉलिवूड चित्रपटही बनला होता, यात अॅमिली ब्लंट मुख्य भूमिकेत होती. हिंदी आवृत्तीत परिणीती मुख्य भूमिका साकारत आहे.

बातम्या आणखी आहेत...