आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Actress Pooja Bedi And Her Fiancé Got Corona, Shared The Video And Said – No Need To Panic, It Is My Personal Decision Not To Get The Vaccine

कोविड 19:अभिनेत्री पूजा बेदीला कोरोनाची लागण, म्हणाली - घाबरण्याची गरज नाही, लस न घेणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूजाने अद्याप कोरोना लसीचा एकही डोस घेतला नाही.

पूजा बेदीला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. तिच्यासह तिचा भावी पती आणि मोलकरीण यांचीही कोविड 19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पूजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून ज्यात "नॅचरल इम्युनिटी"मुळे तिला बरे होण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली. पूजाने अद्याप कोरोना लसीचा एकही डोस घेतला नाही.

मी कोविड पॉझिटिव्ह आहे
रविवारी ऑनलाईन पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पूजा म्हणाली, "सगळ्यांना नमस्कार, मला कोरोनाची लागण झाली आहे. माझ्यासोबतच माझा बॉयफ्रेंड आणि काम करणारी मोलकरीण यांनाही कोरोना झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मला काही अ‍ॅलर्जी झाली होती. यानंतर मला अचानक खोकला सुरु झाला. त्यासोबतच तापही येत होतो. मी काही दिवसांपासून माझे कपाट स्वच्छ केले होते. मला वाटलं धुळीमुळे अ‍ॅलर्जी झाली असावी. मी कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. कोरोना चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले.'

सर्व आवश्यक खबरदारी घेत आहे
पूजा बेदी पुढे म्हणाली, 'मी कोरोनापासून वाचण्यासाठी कोणतीही लस घेणार नाही, हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. त्याउलट नैसर्गिक प्रतिकारशक्ती, पर्यायी उपचारपद्धती आणि निरोगी उपायांनी कोरोना बरा होऊ शकतो. कोरोना हा बरा होतो. त्यामुळे घाबरुन जाऊ नका.' यासोबतच उसाचा रस, काढा, ताजी फळे, वाफ घेणे, कार्बोल टॅबलेट घेणे आणि पाण्यात मीठा टाकून त्यातून गुळण्या करणे, अशा सूचनाही केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...