आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवतीर्थावर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावरून महाराष्ट्राला संबोधित केले होते. यावेळी मनसेच्या नवीन पक्षगीताचे लोकार्पण करण्यात आले. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्त यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मनसेच्या या नव्या गीतावर प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी थिरकली आहे. नुकतेच राज ठाकरे फॅन क्लब या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन प्राजक्ता माळीच्या नृत्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
"प्रश्न जिथे मनसेचा, मार्ग तिथे मनसेचा, नवनिर्माण घडवूया, मनसे…" असे या गाण्याचे बोल असून हे गाणे पाच मिनिटांचे आहे. प्राजक्ताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. "महाराष्ट्राची मराठमोळी शेरणी," अशी कमेंट एका व्यक्तीने या व्हfडीओवर केली आहे. "याला म्हणतात प्राजक्तराजची भरारी, गर्व आहे आम्हाला आमच्या आपल्या अस्सल मराठी कलाकारांचा आपल्या प्राजूचा," असेही एकाने म्हटले आहे.
अवधूत गुप्तेंनी शेअर केला होता गाण्याचा संपूर्ण व्हिडिओ
गायक अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर मनसेच्या नवीन पक्षगीताचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यासह त्यांनी लिहिले होते, "आई एकविरेच्या कृपेने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबईत शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यामध्ये माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या समक्ष काल मनसेचे नवीन पक्षगीत लोकार्पित झाले. याआधी मनसेसाठी मी केलेल्या 'तुमच्या राजाला साथ द्या..' या गीताला लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले! परंतु, याळेस मात्र माझी भूमिका केवळ गायकापुरतीच मर्यादित आहे," असे अवधूत गुप्त यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.