आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Actress Priyanka Chopra Appeals To US President Joe Biden For Help, Says India Is Suffering From COVID 19, Will You Urgently Share Vaccines

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीसाठी आवाहन:भारतातील कोरोनाची सद्यस्थिती बघून दु:खी झाली प्रियांका चोप्रा, पोस्ट शेअर करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना लसीचा साठा पाठवण्याची केली अपील

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियांका म्हणाली - माझ्या देशात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे

भारतात कोरोनाच्या दुस-या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना मृत्यूने पण तांडव घातला आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहाता राज्य आणि केंद्र सरकार अनेक उपाय-योजना राबवत आहेत. तरी देखील रूग्ण संख्या वाढतचं आहे. गेल्या महिन्याभरापासून 45 हूून अधिक वर्षांच्या व्यक्तींचे लसीकरण सुरु आहे. दरम्यान 2 मेपासून 18 पेक्षा अधिक वयाच्या लोकांच्याही लसीकरणाला सुरुवात होत आहे. भारतात कोरोनाची परिस्थिती पाहाता अभिनेत्री प्रियांका चोप्राने भारताबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तिने भारताच्या मदतीसाठी कोरोना लसीचा साठा भारताला पाठवण्याची अपील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि अमेरिकेच्या सरकारी अधिका-यांकडे केली आहे.

माझ्या देशात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे
मंगळवारी प्रियांकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून अमेरिकेच्या सरकारी अधिका-यांना भारताला लस देण्याचे आवाहन केले आहे. सोबतच माझ्या देशात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचेही तिने म्हटले आहे. प्रियांकाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "माझे मन खूप दुःखी आहे. भारत कोरोनाने पीडित आहे. अमेरिकेने आणखी 550 दशलक्ष व्हॅक्सिन ऑर्डर केली आहे. खरं तर इतकी गरज नाहीये. एॅस्ट्राझेन्का लसीचा साठा जगभरात पाठवण्यासाठी POTUS, HCOS, सेक ब्लिंकेन आणि जेक सुलिवन यांचे आभार. पण माझ्या देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आपण तातडीने लसीचा साठा भारताला देऊ शकता का? #vaxlive।," अशा आशयाची पोस्ट प्रियांकाने शेअर केली आहे.

अनेक नेटक-यांनी प्रियांकाला केले ट्रोल
अनेक सोशल मीडिया युजर्स प्रियांकाला तिच्या या पोस्टमुळे ट्रोल करत आहेत. एका नेटक-याने लिहिले, "ही पोस्ट 2 आठवड्यांपूर्वी आवश्यक होती. आपण आपल्या देशातील नागरिकांसाठी व्हॅक्स लाइव्ह मोहिमेची वाट बघायला नको." दुसर्‍या नेटक-याने लिहिले, "सुप्रभात. अमेरिकेने आधीच व्हॅक्सिन डेव्हलपमेंटसाठी कच्चा माल पाठविण्यास सहमती दर्शविली आहे. तू ही पोस्ट काल शेअर करायला हवी होती." तर दुसरीकडे काही लोकांनी प्रियांकाचे कौतुक केले आणि तिच्या प्रयत्नांसाठी तिचे आभारदेखील मानले आहेत.

बातम्या आणखी आहेत...