आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रेशन:अभिनेत्री प्रियंका चोप्राने साजरा केला आई मधूचा वाढदिवस; शेअर केला तिन्ही जनरेशनचा फोटो

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा आज तिचा 64 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, अभिनेत्रीने आई मधु चोप्रा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मुलगी मालती मारिया जोनासचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तिन्ही पिढ्या एकत्र दिसत आहेत. त्याचवेळी प्रियांकाचा पती निकनेही एक सुंदर फोटो शेअर करत मधू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियांकाने मालतीसोबतचा एक फोटो केला शेअर

प्रियांकाने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅपी बर्थडे आई. तू नेहमी हसत राहा. तू नेहमी मली जगण्याची प्रेरणा देतेस. तुझ्यामध्ये असलेला उत्साह मला कायम प्रेरणा देतो. लव्ह यू टू मून आणि बॅक नानी.' चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी फोटोवर कमेंट करत मधुला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

निकने सासू मधू चोप्रा यांना शुभेच्छा दिल्या

दुसरीकडे, निकने सासू मधू चोप्रासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, 'माझ्या सासू मधू चोप्रा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.' हा फोटो पाहून असे दिसते की केवळ प्रियांकाच नाही तर तिची आई देखील निकच्या सॉफ्टबॉल सामन्यांना चिअर करते.

प्रियंका आणि निकने 2018 मध्ये केले लग्न

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे बॉलिवुडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत. 2 डिसेंबर 2018 रोजी उदयपूर येथील उम्मेद भवन येथे या जोडप्याने हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले.

बातम्या आणखी आहेत...