आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या आपल्या मेमॉयर'अनफिनिश्ड' मुळे चर्चेत आहे. जे 9 फेब्रुवारीला लॉन्च झाले आहे. या पुस्तकामध्ये तिने पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफसंबंधीत अनेक खुलासे केले आहेत. या पुस्तकात एक किस्सा तिने शेअर केला आहे. हा किस्स्यामध्ये तिने टिनेजमधील बॉयफ्रेंडविषयी सांगितले आहे. प्रियंकाने सांगितले की, ती शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेली होती आणि एक दिवस तिच्या आंटीने तिला बॉयफ्रेंडसोबत पकडले होते. या वेळी तिने आंटीला बॉयफ्रेंड दिसू नये म्हणून त्याला कपाटात बंद केले होते. पण हे लक्षात आल्यानंतर आटींने प्रियंकाची तक्रार तिच्या आईकडे केली होती.
प्रियंका चोप्राने बुकमध्ये या किस्स्याविषयी सांगितले की, काही वर्षांसाठी ती अमेरिकेत आपल्या रिलेटिव्हसोबत राहत होती आणि शाळेत जात होती. तेव्हा ती एका मुलाच्या प्रेमात पडली होती. प्रियंकाने पुस्तकात लिहिले की, त्याचे नाव 'बॉब' होते. तसेच आंटीने तिला बॉयफ्रेंडसोबत कसे पकडले याविषयी तिने या पुस्तकात सांगितले आहे.
बॉयफ्रेंडसोबत करायचे होते लग्न
प्रियंकाने पुस्तकात लिहिले की, ती 10 वीत होती आणि त्यावेळी अमेरिकेत आपल्या किरण आंटीसोबत इंडियानापोलिसमध्ये राहत होती. तेव्हा शाळेत तिची भेट 'बॉब'सोबत झाली होती. आपल्या फनी अंदाज आणि रोमँटिक जेस्चरमुळे बॉबने प्रियंकाचे मन जिंकले होते. प्रिंयाकने सांगितले की, बॉबने तिला एक चेनही गिफ्ट केली होती. दोघंही शाळेत एकमेकांचा हात पकडून फिरायचे. प्रियंका बॉबच्या प्रेमात पडली होती आणि त्याच्यासोबत लग्न करायचीही इच्छा होती.
मी त्याला कपाटात बंद केले होते
प्रियंकाने लिहिले, 'एक दिवस मी आणि बॉब काउचवर बसून एकमेकांचा हात पकडून टीव्ही बघत होतो. तेव्हा मी खिडकीमधून पाहिले की, आंटी घरी येत आहे आणि मी खूप घाबरले. त्यावेळी दुपारचे 2 वाजत होते आणि ही त्यांची घरी येण्याची वेळ नव्हती. तेव्हा बॉबला घराबाहेर पाठवण्यासाठी कोणताही रस्ता मला सापडला नाही. तेव्हा मी त्याला आपल्या खोलीच्या कपाटात बंद केले होते. यांनंतर मी त्याला म्हणाले होते की, मी आंटीला घराबाहेर पाठवत नाही तोपर्यंत बाहेर निघू नको.'
मावशीला मी एवढ्या रागात कधीच पाहिले नव्हते
प्रियंकाने लिहिले, 'किरण मावशी घरात आली आणि सर्व रुम चेक करु लागली. मी माझ्या बेडवर बसले होते आणि माझ्या हातात बायॉलजीचे पुस्तक होते. मी असे दाखवत होते की, मी अभ्यास करत आहे. मावशी माझ्या रुमच्या दरवाज्याजवळ आली आणि म्हणाली की, हे उघड. मी विचाररले - काय उघडू? आंटी म्हणाल्या - आपली कपाट उघड. मी भितीने थरथरत होते, कारण मी माझ्या मावशीला एवढ्या रागात कधीच पाहिले नव्हते. मी कपाट उघडले आणि सर्व काही समोर आले, कारण त्यात बॉब होता.'
मावशीने आईला फोन करुन केली होती तक्रार
प्रियंकाने याविषयी पुढे लिहिले की, 'मावशीने माझ्या आईला फोन केला आणि म्हटले की, मला विश्वास बसत नाही की, ती माझ्या तोंडावर खोटे बोलत होती. तिच्या कपाटामध्ये मुलगा होता.' यानंतर प्रियंका भारतात परतली आणि तिने मिस इंडिया ब्यूटी पेजेंट स्पर्धेत भाग घेतला होता. ती हे जिंकली आणि मिस वर्ल्ड बनली. यानंतर ती तात्काळ लाइमलाइटमध्ये आली होती. तेव्हापासूनच तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.