आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीसाठी आवाहन:प्रियांका चोप्रा म्हणाली - 'भारत माझा देश, माझं घर कोरोनाशी लढतोय...', जगभरातील लोकांना केले मदतीचे आवाहन

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या काय म्हणाली प्रियांका...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून मृत्यूचेही तांडव बघायला मिळत आहे. देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन आणि औषधांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान सोनू सूद, अक्षय कुमार, अजय देवगण यासारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. आता लंडनमध्ये वास्तव्यास असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय लोकांच्या मदतीसाठी प्रयत्न करीत आहे. अलीकडेच, तिने जगभरातील लोकांना भारताच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करीत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

भारत माझा देश, माझं घर कोरोनाशी लढतोय
व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा म्हणाली, 'मी सध्या लंडनमध्ये आहे आणि भारतात असलेल्या माझ्या कुटुंब आणि मित्रांकडून मला तेथील रुग्णालयांची क्षमता कशी संपली आहे हे समजत आहे. आयसीयू नाहीत, रुग्णवाहिका कमी पडत आहेत, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मृतांचा आकडा जास्त असल्याने स्मशानभूमीत एकाच वेळी अनेकांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. भारत माझा देश, माझे घर सध्या मोठ्या अडचणीत आहे.'

रक्कम थेट आरोग्य सुविधेसाठी दिली जाईल

पुढे ती म्हणाली, 'मदतीसाठी मी गिव्हइंडियासोबत एकत्र येत एका संस्थेची स्थापना केली आहे. तुम्ही यात तुमचे योगदान देऊ शकता, यामुळे बराच फरक पडेल. मला 63 मिलियन लोक फॉलो करतात. प्रत्येकाने 10 डॉलर दिले तरी मोठी रक्कम जमा होईल. ही रक्कम थेट आरोग्य सुविधेसाठी दिली जाईल.' अशी माहिती तिने या पोस्टमध्ये दिली आहे. शिवाय तिने अनेकांना कृपया ‘मदत’ करा असे आवाहन केले आहे.

विषाणूचा पराभव करणे गरजेचे आहे आणि यासाठी प्रत्येकाने एकत्र येणे आवश्यक आहे
प्रियांकाने पुढे लिहिले, "तुमचे देणगी थेट हेल्थकेअर फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, वैद्यकीय उपकरणे, लसीकरणासाठी दिली जाईल. प्लीज-प्लीज डोनेट. मी आणि निक शक्य तितकी मदत करत आहोत. आणि आम्ही भविष्यातही योगदान देत राहू. हा विषाणू किती दूरपर्यंत पसरला आहे, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. प्रत्येकजण सुरक्षित होईपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. आपणा सर्वांना एकत्र येऊन या विषाणूचा पराभव करायचा आहे. माझ्या मनापासून सर्वांचे आभार."

बातम्या आणखी आहेत...