आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी, अभिनेत्रीने मागितली सायबर सेलकडे मदत 

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. सोशल मीडियावर केली जाणाऱ्या टीकेमुळे आणि धमक्यांवर ती आतापर्यंत गप्प होती. मात्र आता तिचा संयम सुटला आहे. रियाने सतत मिळत असलेल्या रेप आणि जीवे मारण्याच्या धमक्यांच्या प्रूफसोबत एक पोस्ट लिहिली आहे. 

रियाने ट्रोलरद्वारे मिळालेल्या धमकीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. मन्नू राऊत नावाच्या या ट्रोलरच्या डीपीमध्ये एका महिलेचा फोटो लावलेला दिसतोय. रियाला मॅसेज करत लिहिले आहे की, तुझ्यावर बलात्कार होईल की, तुझी हत्या होईल हे मी निश्चित करेल, तु आत्महत्या करुन घे किंवा लवकरच मी तुला जीवे मारण्यासाठी लोकांना पाठवेल. 

रियाने ट्रोलरला दिले चोख प्रत्युत्तर 
रियाने या ट्रोलरला प्रत्युत्तर देऊन लिहिले की, मला गोल्ड डिगर म्हटले होते, मी गप्प बसले. मला खुनी म्हणतात, मी गप्प बसले. परंतु माझ्या शांत बसण्याने आपल्याला हा अधिकार कसा दिला की, तुम्ही माझ्यावर बलात्कार कराल किंवा खून कराल? आपण जे बोललात त्याबद्दलचे गांभीर्य आपल्याला समजते का? हा गुन्हा आहे आणि कायद्यानुसार कोणीही नाही, मी पुन्हा सांगते की, कोणीही अशा प्रकारचे विष पसरवू शकत नाही आणि छळही करू शकत नाही. मी @cyber_crime_helpline @cybercrimeindia ला मागणी करते की, त्यांनी अवश्य कारवाई करावी. आता खूप झाले. 

सुशांतच्या निधनानंतर रिया सोशल मीडियापासून लांब होती. पण तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. रियाने सुशांतसाठी इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली होती.

पोस्टमध्ये रियाने व्यक्त केल्या भावना

रियाने सुशांतसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. यात दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. रियाने लिहिले - "अजूनही मी माझ्या भावनांशी झगडत आहे. माझ्या अंतःकरणात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तू मला प्रेमावर विश्वास ठेवायला शिकवले. त्याची ताकद काय असते ते सांगितले. साधे गणिताचे कोडे आयुष्याचा अर्थ कसे उलगडू शकेल हे शिकविले आणि मी तुला वचन देते की मी दररोज तुझ्याकडून हे शिकत राहणार आहे. 

एक चांगला व्यक्ती म्हणून तू सर्वकाही होतास.. जगाने पाहिलेले आश्चर्य होतास. मला माहितीय तू आता खुप जास्त निवांत आयुष्य जगतोय. हे आकाश, हे चंद्र-तारे सर्वच तुझे म्हणजेच एका महान भौतिकशास्त्रज्ञाचे मोठ्या उत्साहात स्वागत करत असणार. मी माझ्या शूटिंग स्टारची वाट पाहत आहे, जो तुला माझ्याकडे परत आणण्याची माझी इच्छा पूर्ण करू शकेल.

आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी माझे शब्द अपुरे आहेत. आणि मला माहितेय की, तुला याचा अर्थ माहित होता. तूच मला सांगितले होते की, याचा अर्थ काय आहे हे आपल्याला माहित आहे. तू मोकळ्या मनाने सर्वांना पसंत करायचा आणि आता आपल्यातील हे प्रेम खरोखरंच वाढत आहे हे तू मला दाखवले आहे. 

शांततेत राहा सुशी. तुला गमावून 30 दिवस उलटून गेले, परंतु आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करत राहणार आहे... माझ्याशी कायम जुळून रहा. अनंत दिशेने आणि त्यानंतरही."

रिया-सुशांत लग्न करणार होते
सुशांत आणि रियाच्या लग्नाची बातमी रियाचा प्रॉपर्टी डीलर सनी सिंगने दिली होती. दोघेही यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार होते, त्यासाठी ते मुंबईत घराच्या शोधात होते, असे सनी सिंगने सांगितले होते.

रियाची 11 तास चौकशी झाली होती 

सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात मुंबईत पोलिसांनी 11 तास रिया चक्रवर्तीची चौकशी केली होती. पोलिसांनी रियाला सुशांतसोबतचे तिचे नाते, भांडणं, फोन कॉल्स, मेसेजस आणि सुशांतच्या नैराश्याबद्दल प्रश्न विचारले होते. तसेच रियाचा भाऊ सोविज चक्रवर्ती याचीही पोलिसांनी चौकशी केली होती. रिया आणि सोविझ दोघेही सुशांतच्या तीन स्टार्टअप कंपन्यांमध्ये संचालक आणि अतिरिक्त संचालक म्हणून कार्यरत होते.