आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगाली थिएटर आर्टिस्ट बिनोदिनी दासीवर येणार चित्रपट:'सनक' फेम रुक्मिणी मैत्रा झळकणार मुख्य भूमिकेत, 2023 मध्ये होणार रिलीज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बंगालच्या थिएटर लिजेंड 'बिनोदिनी दासी' यांचे कथनात्मक चरित्र 'नटी बिनोदिनी' या आगामी बंगाली चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांनी त्यांच्या बहुचर्चित बायोपिक 'बिनोदिनी एकटी नटीर उपाख्यान' मधील मुख्य कलाकारांची घोषणा केली. बंगालजची प्रसिद्ध अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा मुख्य भूमिका साकारणार आहे. रुक्मिणीने याआधी विद्युत जामवाल स्टारर 'सनक' चित्रपटात काम केले होते.

निर्मात्यांनी चित्रपटाच्या टिझर पोस्टरचे अनावरण केले. त्या पोस्टरवर रुक्मिणी मैत्रा श्री चैतन्य महाप्रभू यांच्या भूमिकेत दिसत आहे. बिनोदिनी दासी यांनी श्री चैतन्य महाप्रभू यांची व्यक्तिरेखा रंगभूमीवर साकारली होती. मोशन पोस्टर एकता भट्टाचार्य यांनी डिझाइन केले असून त्याला नीलायन चॅटर्जी यांनी संगीत दिले आहे.

प्रमोद फिल्म्स ,एस एस वन एन्टरटेनमेन्ट आणि पी के एन्टरटेनमेन्ट या मुंबई स्थित निर्मिती संस्थांची निर्मिती असलेल्या आणि एसोर्टेड मोशन पिक्चर्सचे सहकार्य असलेल्या या चित्रपटाची कथा ,पटकथा आणि संवाद प्रियांका पोद्दार यांनी लिहिले आहेत.

"मला कायमच बंगाली प्रेक्षकांसाठी बिनोदिनी दासी यांची प्रभावित करणारी कथा सांगायची होती. अशा सांगीतिक चित्रपटाकरिता मला अपेक्षित असलेले बजेट मिळवण्याकरिता मला जवळजवळ दोन वर्षे संघर्ष करावा लागला. या सर्व प्रवासात माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी एकमेव व्यक्ती म्हणजे रुक्मिणी मैत्रा. रुक्मिणी माझी बिनोदिनी होईल याचा मला आनंद आहे,” असे राम कमल मुखर्जी म्हणाले.

रुक्मिणी गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहे. या भूमिकेकरिता तिने शास्त्रीय नृत्याच्या सरावापासून ते अगदी त्या काळातील स्त्रियांच्या सामाजिक स्थितीविषयी भाष्य करणाऱ्या अनेक पुस्तकांचे वाचन देखील केले. "माझे स्वप्न सत्यात अवतरले. ज्यावेळी राम कमल यांनी सांगितले की त्यांना बिनोदिनी निर्माण करायची आहे, तेव्हापासून मला माहित होते की त्यांचा या विषयावरचा वेगळा दृष्टिकोन असेल. त्यांना एकही प्रश्न न विचारता मी त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला. हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी घडला असता, परंतु कोरोना महामारीने संपूर्ण परिस्थिती बदलली.आपल्या मनोरंजन उद्योगावर खूप परिणाम झाला. असे नामांकित बॅनर्स , निर्माते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देव हे प्रस्तुतकर्ते म्हणून आमच्यासोबत आल्याने हा चित्रपट नक्कीच भव्य निर्मिती करणारा ठरणार आहे असे "रुक्मिणी मैत्रा सांगते.

रुक्मिणीसह गिरीश घोष, अमृतलाल, ज्योतिंद्रीनरथ, रामकृष्ण, कुमार बहादूर आणि रंगा बाबू हे कलाकार या चित्रपटात आहेत. देव एन्टरटेनमेन्ट व्हेंचर या चित्रपटाची प्रस्तुती करणार असून त्याची निर्मिती शैलेंद्र कुमार ,सूरज शर्मा आणि प्रतीक चक्रवर्ती करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...