आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हाला माहीत आहे?:साधनाच्या झुमक्यांनी प्रसिद्ध झाले बरेली शहर, मोठे कपाळ लपवण्यासाठी ठेवला होता फ्रिंज लुक, बनली स्टाइल 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1960 ते 70 च्या दशकातील अभिनेत्री साधना यांची हिंदी चित्रपटातील सर्वांत जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीमध्ये गणना केली जात होती.
  • साधना यांनी जवळपास 30 चित्रपटांत काम केले.
  • साधना यांचे नाव त्यांच्या वडिलांनी त्यांना आवडत असणाऱ्या अभिनेत्री साधना बोस यांच्या नावावर ठेवले होते.

अभिनेत्री साधना यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी नूतन यांच्याकडून प्रेरणा घेतली. वडिलांच्या मदतीने त्या चित्रपटात आल्या. ज्या काळात फक्त अभिनेत्रीच्या शैलीचीच चर्चा असायची त्या काळात त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या करिअर आणि आयुष्याशी निगडीत काही रंजक किस्से...

आज आपण बॉलिवूडच्या ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साधना यांच्याबाबत जाणून घेणार आहोत. मुले त्यांच्या अदांचे वेडे तर होतेच, पण मुलीदेखील त्यांच्यासारखी हेअर स्टाइल करायच्या. प्रत्येक मुलगी ‘साधना कट’ हेअरस्टाइलमध्ये दिसायची. त्यांचे हास्य आणि टपोऱ्या डोळ्यांनी घायाळ होणारे लोक आजदेखील त्यांचे स्मरण करून म्हणतात... ऐ फूलों की रानी बहारों की मलिका...

  • ‘लव इन शिमला'च्या सेटवर जडले नय्यर यांच्यावर प्रेम

साधना यांचा मुख्य नायिका म्हणून ‘लव इन शिमला’हा पहिला चित्रपट होता. ज्याचे दिग्दर्शन कृष्णा नय्यर यांनी केले. चित्रपटातील नायक जॉय मुखर्जी होते, परंतु चित्रपट पूर्ण होता-होता आर.के.नय्यर हे साधना यांचेच नायक झाले. दोघांची भेट चित्रपटाच्या सेटवरच झाली. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांचे नय्यर यांच्यावर प्रेम जडले आणि दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. साधना त्यावेळी 16 तर नय्यर 22 वर्षांचे होते. त्यांच्या प्रेमप्रकरणाबाबत साधना यांच्या घरी समजले तर त्यांनी लग्नासाठी नकार दिला, परंतु राज कूपर यांच्या मदतीने दोघांनी लग्न केले.

  • सुपरहिट ‘मेरे मेहबूब’साठी पूर्वी दिला होता नकार

साधना यांनी ‘मेरे महबूब’ चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. याबाबत त्यांनी त्यांचे मित्र आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते यांच्याशी चर्चा केली होती. मुखर्जी यांनी साधना यांना विचारले की, चित्रपटात नायक कोण आहे. त्यांनी उत्तर दिले राजेंद्र कुमार मुख्य भूमिकेत आहेत. राजेंद्र कुमार यांचे नाव ऐकताच ऋषिकेश दा यांनी साधना यांना सल्ला दिला की, त्यांनी हा चित्रपट जरूर करावा कारण राजेंद्र उत्कृष्ट स्क्रिप्टची निवड करतात. त्यांनी हमी दिली की चित्रपट हिट होईल. यानंतर साधना यांनी चित्रपटासाठी होकार दिला आणि चित्रपट ब्लॉकबस्टर झाला.

  • सस्पेंस थ्रिलर चित्रपटांनी दिला मिस्ट्री गर्लचा टॅग

साधना यांनी दिग्दर्शक राज खोसला यांच्यासाेबत ‘मेरा साया’, ‘वो कौन थी’ आणि ‘अनिता’ या तीन थरारक चित्रपटात काम केले आहे. तीनही चित्रपट सुपरहिट झाले आणि त्यांच्या करिअरमधील मैलाचे दगड ठरले. यादरम्यान साधना यांना ‘मिस्ट्री गर्ल’चा टॅग मिळाला. ‘वो कौन थी’साठी त्यांना फिल्मफेअरसाठी नामांकनदेखील मिळाले. यात त्या दुहेरी भूमिकेत होत्या. या चित्रपटात त्या आत्म्याच्या रूपात होत्या. चित्रपटातील त्यांचे गाणे ‘लग जा गले’ आणि ‘मेरा साया साथ होगा’ खूप प्रसिद्ध झाले. काही दिवसांनंतर त्यांना थायरॉइड झाला आणि त्याच्या उपचारासाठी त्या बोस्टन शहरात गेल्या. परत आल्यावर त्यांनी ‘इंतकाम’, ‘एक फूल दो माली’, ‘सच्चाई’, ‘दिल दौलत दुनिया’, ‘गीता मेरा नाम’ सारखे हिट चित्रपटात काम केले.

  • साधनाच्या झुमक्यांनी प्रसिद्ध झाले बरेली शहर

साधना यांच्यावर चित्रित केलेले ‘झुमका गिरा रे बरेली के बाजार में...’ हे गाणे सर्वांत जास्त लोकप्रिय झाले. या गाण्यामुळे बरेली शहर झुमक्यांसाठी प्रसिद्ध झाले. अलीकडेच साधना यांच्या गाण्यातील झुमक्याची मोठी प्रतिकृती करून प्रवेश मार्गावरील परसाखेडातील चौकामध्ये लावण्यात आली आहे. त्याचे नाव झुमका तिराहा ठेवले आहे. या झुमक्याला 14 फूट उंचीवर लावण्यात आले. त्याचे वजन 200 किलोग्राम आहे. या झुमक्यांमध्ये रंगीत खडे जडलेले आहेत.

  • मोठे कपाळ लपवण्यासाठी ठेवला फ्रिंज लुक, बनली स्टाइल

साधना यांना पाहता क्षणीच दिग्दर्शक आर.के. नय्यर म्हणाले होते की, तुझे मोठे कपाळ लपवण्यासाठी तू फ्रिंज हेअरस्टाइल कर. साधना यांनी त्यांचे म्हणणे ऐकले आणि त्यांना नवीन लूक देण्यात आला. पहिल्याच चित्रपटात त्यांचा हा लूक जबरदस्त हिट झाला. हा लूक हॉलिवूड अभिनेत्री ऑड्रे हेपबर्नपासून प्रेरीत होता. ६० च्या दशकात हा खूप लोकप्रिय झाला जवळपास प्रत्येक मुलींनी या हेअरस्टाइलला फॉलो केले. त्यानंतर साधना यांचा पहिला चुडीदार सलवार-कुर्तादेखील खूप लोकप्रिय झाला. त्यांनी सैल सलवार-कुर्ताच्या फॅशनला बदलले होते. यश चाेप्रा ‘वक्त’ चित्रपटाची निर्मिती करत होते त्यावेळी हा बदल झाला. त्यांना भीती वाटत होती की, लोक या फॅशनला स्वीकारतील की नाही, परंतु साधना यांनी डिझायनर भानू अथय्या यांच्या सोबत चित्रपटात या फॅशनला आणले. आणि ती लोकप्रियही झाली.

  • ‘श्री 420' मध्ये त्या दिसल्याच नाहीत, मैत्रिणीसमोर झाला अपमान

साधना या शिक्षणासोबतच नृत्य शिकायला जायच्या. ज्या शाळेत त्या नृत्य शिकायला जायच्या तेथे एक दिवस एक नृत्य दिग्दर्शक आले होते. त्यांनी सांगितले की, राजकपूर यांना त्यांच्या ‘श्री 420’ चित्रपटात एका ग्रुप डान्ससाठी चांगल्या नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनींची गरज आहे. साधना यांच्या शिक्षिकेने काही मुलींंना नृत्य करायला लावले. ज्या मुलींची निवड करण्यात आली होती त्यात साधनादेखील होत्या. यानंतर त्यांना ‘मुड-मुड के न देख’ या गाण्यात मागे नृत्य करण्यासाठी संधी मिळाली. साधना चित्रीकरणात दररोज सहभागी व्हायच्या. नृत्य दिग्दर्शक जसे सांगायचे तसेच साधना करायच्या. एक दिवस आपणही मोठ्या पडद्यावर दिसू असा विचार करून त्या मनातल्या मनात आनंदी व्हायच्या. ज्यावेळी चित्रपट प्रदर्शित झाला आणि साधना सर्व मैत्रिणींना स्वत: चित्रपट पाहायला सिनेमागृहात घेऊन गेल्यात. परंतु कोणत्याही गाण्यात त्या दिसल्या नाही. त्यावेळी मैत्रिणी त्यांना म्हणाल्या, तू तर कोणत्याच गाण्यात नाहीस. यामुळे साधना यांना अपमानित झाल्यासारखे वाटले.

बातम्या आणखी आहेत...