आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:अभिनेत्री सागरिका घाटगेला पितृशोक, भावूक पोस्ट शेअर करत म्हणाली - मला माहीत आहे की तुम्ही एका सुंदर जागी गेला आहात

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 9 जानेवारी रोजी सागरिकाच्या वडिलांचे निधन झाले.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्या वडिलांचे 9 जानेवारी रोजी निधन झाले. सोशल मीडियावर तिने ही माहिती दिली आहे. वयाच्या 64 व्या वर्षी तिच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनानंतर सागरिकाने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली. यात तिने वडिलांसोबतचे अनेक फोटो शेअर केले आणि वडिलांसाठीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

सागरिकाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन वडिलांचे आई, भाऊ आणि पती झहीर खानसोबतचे फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करताना सागरिकाने लिहिले, 'तुम्ही आमच्यासोबत नाही यावर विश्वास बसत नाही. मला माहीत आहे की तुम्ही एका सुंदर जागी गेला आहात. एक अशी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीच भरून येऊ शकत नाही. मला सशक्त करण्यासाठी तुमचे आभार. तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे,' अशा शब्दांत सागरिकाने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

सागरिकाच्या वडिलांनी 9 जानेवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या एक दिवसआधी म्हणजे 8 जानेवारीला सागरिकाचा वाढदिवस होता. सागरिकाला 'चक दे गर्ल' म्हणूनही ओळखले जाते. चक दे 'इंडिया'सह 'रश', 'इरादा' या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...