आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाने मागितली सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग यांची माफी, हे आहे त्यामागचे कारण

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडियावर #SorryRakul, #SorrySara ट्रेंड करत आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमली पदार्थासंबंधित चॅट्स समोर आल्यानंतर एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. सध्या रिया भायखळा तुरुंगात आहे. दरम्यान एनसीबीच्या चौकशीत रियाने 25 बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे घेतल्याचे वृत्त आले होते. यामध्ये अभिनेत्री सारा अली खान, रकुलप्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांच्या नावाचा समावेश असल्याची चर्चा होती.

सोशल मीडियावर सारा आणि रकुलला यावरून ट्रोल देखील करण्यात आले, त्यांच्यावर खूप मीम्स देखील शेअर केले गेले. मात्र अमली पदार्थविरोधी पथकाचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी हे वृत्त फेटाळले आहे आणि असा कोणताही रिपोर्ट बनवला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सोशल मीडियावर #SorryRakul, #SorrySara ट्रेंड करत आहे. काही कलाकारांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग यांची माफी मागितली आहे. त्यामुळे समंथाची पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. समंथाने या पोस्टमध्ये एक स्क्रिन शॉट शेअर करत हॅशटॅग वापरले आहेत. सॉरी सारा आणि सॉरी रकुल असे हॅशटॅग तिने वापरले आहेत.

‘फ्री प्रेस जर्नल’ला अमली पदार्थविरोधी पथकाचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले की, ‘आम्ही बॉलिवूड कलाकारांची कोणतीही यादी तयार केलेली नाही. यापूर्वी तयार केलेली यादी ड्रग्स पेडलर आणि तस्करांची होती. त्यामुळे ती बाॉलिवूडची असल्याचा गोंधळ झाला.’