आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढ-या केसांवर अभिनेत्रीचे मत:समीरा रेड्डीने पांढऱ्या केसांमधील स्वतःचे फोटो केले शेअर, म्हणाली - माझे वडील माझ्या पांढऱ्या केसांमुळे चिंतेत आहेत

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या फोटोंमध्ये तिचे पांढरे केस स्पष्ट दिसत आहेत.

अभिनेत्री समीरा रेड्डी बऱ्याच काळापासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर कायम पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना सेल्फ लव्ह, मानसिक आरोग्य, बॉडी पॉझिटिव्हिटी आणि इतर अनेक मुद्द्यांवरुन जागरुक करत असते. आता अलीकडेच समीराने तिचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचे पांढरे केस स्पष्ट दिसत आहेत. फोटोसोबतच तिने 'हेअर व्हाइटनिंग'बद्दल एक पोस्ट लिहिली आहे. यासोबतच तिने तिच्या वडिलांसोबत 'हेअर व्हाइटनिंग' बद्दल केलेल्या चर्चेबद्दलही सांगितले आहे. तिने सांगितल्यानुसार, तिचे वडील तिच्या पांढऱ्या केसांमुळे चिंतेत असून ती तिचे पांढरे केस का लपवत नाही असा प्रश्न त्यांनी समीराला विचारला होता.

माझे वडील म्हणाले की, तू पांढरे केस का लपवत नाही?
फोटो शेअर करत समीरा रेड्डीने लिहिले, 'माझ्या वडिलांनी मला विचारले की मी माझे पांढरे केस का लपवत नाही. त्यांना काळजी वाटते की लोक मला जज करतील. मी उत्तर दिले - जर लोक मला जज करत असतील तर काय फरक पडतो, यामुळे मला म्हातारी किंवा कमी आकर्षक किंवा कमी सुंदर समजले जाईल का?' मी माझ्या वडिलांना सांगितले, 'आता मला या गोष्टींचा त्रास होत नाही. जसा मला पुर्वी व्हायचा. स्वतंत्र असण्याचा हा एक आनंद आहे. पुर्वी माझा एकही पांढरा केस दिसू नये म्हणून मी दर दोन आठवड्यांनी माझे केस कलर करायचे. आज केस रंगवायचे की नाही याचा निर्णय मी स्वत: घेते," असे समीरा म्हणाली.

आत्मविश्वासाला एखाद्या मास्क किंवा कव्हरच्या मागे लपण्याची गरज नाही
समीरा रेड्डीने पुढे लिहिले, "मला माहितेय मी एकटी नाही. जेव्हा जुन्या विचारांच्या पद्धती मोडल्या जातात तेव्हाच बदल घडतो. आपण जसे आहोत तसेच राहू दिले तर बदल घडणे शक्य आहेत. जेव्हा आपल्याला एखद्या रंगाच्या किंवा मास्कच्या मागे लपण्याची गरज भासणार नाही तेव्हाच आपला आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक दिवस आपल्याला पुढे जाण्याची शिकवण देतो यातूनच शांती मिळते." समीराच्या या पोस्टला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. आणि सोशल मीडियावर तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. समीरा रेड्डी 2013 मध्ये आलेल्या 'वरधान्यका' या कन्नड चित्रपटात शेवटची मोठ्या पडद्यावर दिसली होती.

बातम्या आणखी आहेत...