आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल व्हिडिओ:सारा अली खानच्या नाकाला दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली - 'सॉरी अम्मा-अब्बा मी नाक कापले'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साराचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.

अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या आगामी प्रोजेक्ट आणि आयुष्याशी संबंधित गोष्टी कायम चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच साराने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत साराच्या नाकाला दुखापत झालेली दिसत असून ती आपल्या आईवडिलांची माफी मागताना यात दिसतेय.

या व्हिडिओमध्ये सारा अली खान तिच्या नाकाला झालेल्या दुखापतीबद्दल सांगताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने मजेशीर अंदाजात लिहिले, "माफ करा अम्मा-अब्बा लागले, नाक कापले मी." साराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि त्याला चाहत्यांची पसंतीदेखील मिळताना दिसतेय.

'अतरंगी रे' मध्ये अक्षयसोबत दिसणार सारा
साराच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास ती लवकरच 'अतरंगी रे' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथचा सुपरस्टार धनुष यांच्या मुख्य भूमिका आहेत.
यापूर्वी सारा 'कुली नंबर 1' चित्रपटात वरुण धवनसोबत दिसली होती.

बातम्या आणखी आहेत...