आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाॅलीवूडनंतर क्रिकेट जगताची विकेट:आयपीएल पार्टीत क्रिकेटपटूंच्या पत्नीही करत होत्या ड्रग्जचे सेवन, अभिनेत्री शर्लिन चोप्राचा सनसनाटी दावा

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फॅशन डिझायनर खंबाटाची 4 तास झाडाझडती, दिपिका,सारा,श्रध्दाची उद्या चौकशी

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमली पदार्थ प्रतिबंधक संस्थेने (एनसीबी) अमली पदार्थाच्या सेवनावरून मिळालेल्या माहितीनंतर चाैकशीची व्याप्ती वाढवली आहे. आजवर बाॅलीवूडपर्यंत मर्यादित असणाऱ्या या प्रकरणाचे धागेदाेरे टीव्ही इंडस्ट्रीसह क्रिकेटपर्यंत जाऊन पाेहाेचले आहेत. आयपीएल स्पर्धेेदरम्यान क्रिकेटपटूंच्या पत्नीही अमली पदार्थ सेवन करताना पाहिल्याचा सनसनाटी गौप्यस्फोट अभिनेत्री शलिन चोप्राने एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. दरम्यान, प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक करण जाेहर यांचे धर्मा प्रॉडक्शन एनसीबीच्या रडारवर आले. त्यानुसार धर्मा प्रॉडक्शनचे िदग्दर्शक क्षितिज रविप्रसाद यांना चाैकशीसाठी बाेलावले आहे.

शुक्रवारी ते एनसीबीसमाेर हजर हाेतील, अशी चिन्हे आहेत. अभिनेत्री दिपिका पदुकोण हिने समन्स स्वीकारले असून शनिवारी ती चौकशीसाठी एजन्सीसमोर हजर होईल,अशी माहिती एनसीबीचे संचालक केपीएस मल्होत्रा यांनी दिली. दरम्यान, फॅशन डिझायनर सिमाेन खंबाटा यांची गुरुवारी चार तास चाैकशी केली. याव्यतिरिक्त श्रुती मोदीची तिसऱ्यांदा एनसीबी कार्यालयात चौकशी केली.

दिग्गज क्रिकेटर्स, सुपरस्टार्स व त्यांच्या पत्नीला पार्टीत अमली पदार्थ घेताना पाहिले : शर्लिनचा दावा
अभिनेत्री शर्लिन चोप्राने म्हणाली, एकदा आयपीएल स्पर्धेदरम्यान कोलकातामध्ये केकेआरचा सामना पाहण्यासाठी गेले होते. त्या वेळी आयोजित पार्टीत खूप वेळ डान्स केला आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूमकडे गेले.पण वॉशरुमधील दृश्य पाहून चकीत झाले. तिथे अनेक बडे क्रिकेटपटू, बॉलिवूड सुपरस्टार्स यांच्या पत्नी पार्टीत व्हाइट पावडर म्हणजेच कोकेनचे सेवन करीत होत्या.माझ्याकडे पाहून त्या हसल्या. मीही त्यांच्याकडे पाहून हसले आणि नंतर तिथून काढता पाय घेतला.

भूक शमवणे, तरुणपणा जपण्यासाठी अनेक अभिनेते घेतात ड्रग्ज : राखी सावंतचा दावा
अनेक अभिनेते-अभिनेत्री अमली पदार्थांचे सेवन करतात. बहुतांश जण भूक लागू नये म्हणून हे उपद््व्याप करतात. अनेक कलाकार स्वत:ला स्लिम व तरुण ठेवण्यासाठी अमली पदार्थ घेत असल्याचा दावा अभिनेत्री राखी सावंतने ‘दिव्य मराठी’ शी बोलताना केला. भूक लागू नये म्हणून वीड मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे ती म्हणाली.

बातम्या आणखी आहेत...