आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Actress Shikha Malhotra Suffers Paralysis Stroke, Changed 3 Hospitals Within 2 Days; Now Admitted To Government Hospital Due To Expensive Treatment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॅरालिसिस स्ट्रोक:कोरोना रुग्णांची सेवा करणा-या अभिनेत्री शिखा मल्होत्राला अर्धांगवायूचा झटका, 2 दिवसांत 3 हॉस्पिटल बदलले; महागड्या उपचारांमुळे आता सरकारी इस्पितळात दाखल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिखाला आता सरकारी रुग्णालय केईएममध्ये हलवण्यात आले आहे.

अभिनेत्री शिखा मल्होत्राला 10 डिसेंबर रोजी अर्धांगवायूचा झटका आला. तिला तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दुसर्‍या दिवशी तिला कूपर रुग्णालयात हलवण्यात आले. शिखाची मॅनेजर अश्विनी शुक्ला यांनी दैनिक भास्करशी बोलताना सांगितले की, तब्येत फारशी सुधारली नसल्यामुळे शिखाला आता सरकारी रुग्णालय केईएममध्ये हलवण्यात आले आहे.

महागड्या उपचारामुळे शिखाला सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले
अश्विनी शुक्ला म्हणाल्या, "शिखाला सुरुवातीला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला कूपर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तिथे तिच्या प्रकृतीत फारशी सुधारणा दिसली नाही, त्यामुळे तिला शासकीय रुग्णालय केईएम येथे हलवण्यात आले. तेथे न्यूरोलॉजीचा मोठा विभाग आहे. मुंबईचे डिप्टी म्युनिसिपल कमिश्नर चंद्रशेखर छोरे यांनी संपूर्ण व्यवस्था पुरवली. शिखा मागील सहा महिन्यांपासून कोविड रुग्णांची सेवा करत होती. त्यामुळे आयुक्त वैयक्तिकरित्या केस हाताळत आहेत. शिखावर उपचार करण्यासाठी हे 2 दिवसांत हे तिसरे हॉस्पिटल असेल. ज्या दिवशी तिला स्ट्रोक आला होता, त्यावेळी आम्ही तिला ताबडतोब कोकिलाबेन रुग्णालयात नेले. मात्र, आम्ही त्या हॉस्पिटलचा खर्च उचलू शकत नव्हतो. ते एक लक्झरी पंचतारांकित रुग्णालय आहे. तिथेर उपचार घेणे खूप महाग आहे. आम्ही तिला त्याच रात्री कूपर रुग्णालयात आणले. सरकारी रुग्णालयात हलवण्याचे कारण येथे उपचार स्वस्त आहेत. "

अर्धांगवायूमुळे शिखाचा चेहरा थोडा वाकडा झाला आहे
शिखाच्या प्रकृतीविषयी बोलताना अश्विनी पुढे म्हणाल्या, "अर्धांगवायूमुळे तिच्या शरीराच्या उजव्या बाजूवर परिणाम झाला आहे. तिला हात आणि पाय हलवता येत नाहीये. तिचा चेहरादेखील किंचित वाकडा झाला आहे. लवकरात लवकर ती बरी व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना करत आहोत."

माझी मुलगी लवकर ठीक व्हावी अशी प्रार्थना करा
शिखाला जेव्हा अर्धांगवायूचा झटका आला तेव्हा तिच्यासोबत तिची आई शोभा देवी घरी होत्या. दैनिक भास्करशी झालेल्या संभाषणादरम्यान शोभा देवी म्हणाल्या, "माझी मुलगी गेल्या 6 महिन्यांपासून कोविड रूग्णांची सेवा करत आहे. हा दिवस बघावा लागेल हे कोणाला माहित होते. तिला स्वतःच कोरोनाची लागण झाली होती. 22 ऑक्टोबर रोजी तिला डिस्चार्ज मिळाला होता. तेव्हापासून ती घरी होती. त्या रात्री आम्ही एकत्र जेवण केले, सर्वकाही ठीक होते आणि अचानक ही घटना घडली. माझी मुलगी लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहे.'

नर्सिंगचे शिक्षण घेतले
शिखा मल्होत्रा संजय मिश्रासोबत 2019 मध्ये आलेला चित्रपट ‘कांचली’ मध्ये मुख्य अभिनेत्री होती. त्याशिवाय तिने ‘रनिंग शादी या चित्रपटात तापसी पन्नूबरोबर काम देखील केले आहे. याशिवाय ती शाहरुख खानसोबत 'फॅन' या चित्रपटातही झळकली. शिखाने वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि दिल्लीमधील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये 2014 मध्ये नर्सिंगचे शिक्षण घेतले आहे. मात्र, शिक्षणानंतर तिने अभिनय क्षेत्रात नशीब आजमावले. मागील सहा महिने तिने मुंबईतील जोगेश्वरी येथील 'हिंदू हृदय सम्राट ट्रॉमा सेंटर' येथे नर्स म्हणून कोरोना रूग्णांची सेवा केली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser