आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्यू:शिल्पा शेट्टीने सांगितले, 'अनेक मिसकॅरेज झाले, मुलं दत्तक घेण्यासाठी 4 वर्षे प्रयत्न केले मग आई बनवण्यासाठी सरोगेसीची मदत घेतली'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पा-राज यांची मुलगी समीशाचा जन्म 15 फेब्रुवारी रोजी झाला.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये शिल्पा शेट्टी सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीची आई बनली. एका मुलाखतीत तिने मुलीच्या जन्मासाठी सरोगसीचा अवलंब का केला याविषयी सविस्तरपणे सांगितले. शिल्पा म्हणाली, "वियान (मुलगा) नंतर आम्ही बर्‍याच दिवसांपासून दुसर्‍या मुलासाठी प्रयत्न करीत होतो. पण, मला एपीएलए (अँटीफोस्फोलिपिड अॅन्टीबॉडीज) आहे आणि जेव्हा मी गर्भवती होते तेव्हा हा आजार सक्रिय होतो. यामुळे बर्‍याच वेळा माझे मिसकॅरेज झाले आहे.'

मुलं दत्तक घेण्याचा प्रयत्न केला: 44 वर्षीय शिल्पा पुढे म्हणाली, 'मला माझा मुलगा वियानला एकुलत्या एका मुलासारखा वाढवायचं नव्हतं, ज्याप्रमाणे मला एक बहीण आहे, त्याचप्रमाणे त्यालासुद्धा एक भाऊ-बहिणी असावे असे मला वाटत होते. कारण ते आवश्यक आहे. एक वेळ अशी होती की, मी मुलं दत्तक घेण्याचा प्रयत्न केला पण तेही शक्य नव्हते. मी चार वर्षे वाट पाहिली आणि अखेर सरोगसीचा मार्ग अवलंबला.'

शिल्पा म्हणाली, 'यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा आम्हाला कळले की आम्ही पुन्हा आईवडील होणार आहोत, तेव्हा आम्ही आमचे वर्क शेड्युल एका महिन्यासाठी फ्री ठेवले जेणेकरुन बाळाला जास्तीत जास्त वेळ देता यावा. त्याकाळात मी 'निकम्मा' हा चित्रपट साइन केला होता आणि 'हंगामा'साठीही तारखा दिल्या होत्या.  

15 फेब्रुवारी रोजी झाला मुलीचा जन्म : शिल्पा-राज यांची मुलगी समीशाचा जन्म 15 फेब्रुवारी रोजी झाला परंतु तिने 21 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त मुलीच्या जन्माची बातमी शेअर केली. यानंतर शिल्पाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला नेहमीच मुलगी पाहिजे होती आणि तिने 21 वर्षांपूर्वी मुलीच्या नावाचा विचार केला होता. याआधी दोघांनाही वियान नावाचा मुलगा झाला आहे. वियानचा जन्म 2012 मध्ये झाला होता. शिल्पा-राज यांचे 22 नोव्हेंबर 2009 रोजी लग्न झाले. शिल्पा ही राजची दुसरी पत्नी आहे.

बातम्या आणखी आहेत...