आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पोन्नियन सेल्वन'मधील अभिनेत्री शोभिता धुलिपालाचा लूक आला समोर:अतिशय सुंदर दिसली, चाहते म्हणाले - ती ऐश्वर्या रायला टक्कर देतेय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मणिरत्नम यांचा बहुचर्चित 'पोन्नियन सेल्वन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकामागून एक चित्रपटातील सर्व पात्रांचे लूक समोर येत आहेत. दरम्यान, 4 सप्टेंबर रोजी अभिनेत्री शोभिता धुलिपालाचा लूक समोर आला आहे. या ऐतिहासिक चित्रपटात ती वनथीच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी शोभिताचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. शोभिता ऐश्वर्या रायला टक्कर देतेय, असे चाहते म्हणाले आहेत.

ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा, विक्रम, कार्ति, जयम रवि, प्रकाश राज, नस्सर, शोभिता धूलिपाला, प्रभु आणि किशोर हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

टिझरने वेधले होते लक्ष
काही दिवसांपूर्वी ‘पोन्नियन सेल्वन’चा जवळपास 1 मिनिट 20 सेकंदाचा टिझर रिलीज झाला होता. या टिझरमध्ये व्हीएफएक्सची कमाल पाहायला मिळाली. भव्य सेट, अप्रतिम व्हीएफएक्स आणि युद्धाचे जबरदस्त अॅक्शन सीन यासोबतच ऐश्वर्याचा चित्रपटातील लूक सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. टिझरच्या सुरुवातीला अभिनेता विक्रमच्या आवाजातील, ‘मदिरा, गान, रक्त और युद्ध, सबकुछ भुलाने के लिए, उसको भुलाने के लिए और अपने आप को भुलाने के लिए’ हा दमदार संवाद ऐकू येतो. या चित्रपटाची कथा ही 10 व्या शतकात दक्षिण भारतावर राज्य करणाऱ्या चोळ सामाज्याची शक्ती आणि संघर्ष यावर आधारित आहे.

‘पोन्नियन सेल्वन’चा हा टिझर 5 भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा हिंदी टिझर अभिनेता अमिताभ बच्चन, मल्याळम टिझर मोहनलाल, कन्नड टिझर रक्षित शेट्टी, तामिळ टिझर सूर्या आणि तेलुगू टिझर महेश बाबू यांनी लाँच केला होता. या चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपये असून हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...