आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एंगेजमेंट:अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या भावाचा झाला साखरपुडा, निर्मात्याच्या मुलीसोबत लग्नाच्या गाठीत अडकणार प्रियांक

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शजा मोरानीसोबत प्रियांकने साखरपुडा केला.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा आणि 'सब कुशल मंगल है' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता प्रियांक शर्मा याचा नुकताच साखरपुडा झाला आहे. चित्रपट निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शजा मोरानीसोबत प्रियांकने साखरपुडा केला. गेल्या काही वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

श्रद्धा कपूचा भाऊ सिद्धांतने सोशल मीडियावर साखरपुड्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ‘तुम्हा दोघांसाठी मी खूप खुश आहे. माझ्या सर्वांत आवडत्या जोडीचं लवकरच लग्न होणार आहे’, असे कॅप्शन देत सिद्धांतने हे प्रियांक-शजासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. या साखरपुड्याला शक्ती कपूर, सिद्धांत आणि शिवांगी कोल्हापुरे यांनी हजेरी लावली होती. शक्ती कपूर यांची पत्नी शिवांगी कोल्हापुरे ही पद्मिनी कोल्हापुरेची बहीण आहे. तर प्रियांक हा अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मावस भाऊ आहे.

कोरोना काळात कोर्ट मॅरेज करणारी दुसरी जोडी
प्रियांक आणि शजा या दोघांनी कोर्टात लग्न करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी दोघांनी कोर्टात अर्ज केला आहे. याशिवाय हे दोघे पारंपरिक पद्धतीनेही विवाहबद्ध होतील. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये ते मोठे रिसेप्शन ठेवणार असल्याचे म्हटले जात आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, प्रियांक आणि शजा या दोघांच्या कुटूंबीयांनी लग्नाची तयारी सुरु केली आहे. प्रियांक शजा सोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत होता. गेली अनेक वर्षे ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जाते. आता ते दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत. अलीकडेच अभिनेता शाहीर शेखनेही रुचिका कपूरसोबत कोर्टात नोंदणी पद्धतीने लग्न केले होते.

रीवाबरोबर प्रियांकने डेब्यू केला होता
प्रियांकने चित्रपटात येण्यापूर्वी नादिरा बब्बर यांचा ग्रुप, नीरज काबी आणि सलीम आरिफ यांच्याबरोबर थिएटर केले आहे. त्याने रवि किशन यांची मुलगी रीवा सोबत 'सब कुशल मंगल है' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. शजा काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे चर्चेत आली होती.

बातम्या आणखी आहेत...