आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनची तिला नुकत्याच येऊन गेलेल्या हार्ट अटॅकवर प्रतिक्रिया आली आहे. याबाबत सुष्मिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून माहिती दिली. सुष्मितावर अँजिओप्लास्टी झाली असून ती सध्या घरी आराम करत आहे.
4 मार्च रोजी सुष्मिताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश शेअर केला. यात तिने सर्वांना अॅक्टिव्ह लाइफस्टाइल फॉलो करण्याची विनंती केली आहे. सुष्मिता म्हणते की, "मला माहिती आहे की तुमच्यापैकी बरेच जण जिममध्ये जाणे थांबवतील आणि म्हणतील की 'याने तिला फायदा झाला नाही', परंतु हे योग्य नाही. जिमने मला मदत केली. मी खूप मोठ्या हृदयविकाराच्या झटक्यातून वाचले. मुख्य धमनीमध्ये 95 टक्के ब्लॉकेज होते, मी सक्रिय जीवनशैली ठेवल्याने वाचले. माझा माहिती आहे की, व्यायामाची किंमत काय आहे. तो एक टप्पा होता आणि मी त्यात उत्तीर्ण झाले. दुसरी बाजू पाहिल्यास, मी खूप भाग्यवानही आहे. यामुळे माझ्या मनात भीती निर्माण होत नाही, त्याऐवजी मला आता काहीतरी करण्याची प्रेरणा मिळत आहे.”
सुष्मिता पुढे म्हणाली, "बरेच तरुण हृदयविकाराच्या झटक्यातून वाचत नाहीत, त्यामुळे स्वत:ची तपासणी करत राहणे फार महत्त्वाचे आहे. महिलांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, हृदयविकाराचा झटका येणे ही फक्त पुरुषांचीच गोष्ट नाही. तसेच, घाबरण्याचेही काही कारण नाही, परंतु जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्हाला जीवनाची नवीन संधी मिळते, तेव्हा तुम्ही त्याचा आदर करता आणि सावध राहता. तेव्हाच तुम्ही व्यायाम करायला शिकता आणि तुमची इच्छा अधिक बळकट करता.
सुष्मिताने तिची खूप काळजी घेतल्याबद्दल रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांचे आभार मानले. "सेट्सवर परत येण्यासाठी आणि तुम्हाला पूर्वी कधीही नसलेला सीझन 3 देण्यासाठी थांबू शकत नाही. एकदा मला माझ्या डॉक्टरांकडून मंजुरी मिळाल्यावर, मी आर्या पूर्ण करण्यासाठी जयपूरला जाईन आणि मी डबिंगवर देखील काम करेन. तालीसाठी."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.